दिलीप परदेशी
जळगाव : जूनचा पंधरवडा निघून गेल्यानंतरही केवळ वर्दी देऊन जाणाऱ्या मॉन्सूनचा पाऊस जिल्ह्यात अपेक्षेप्रमाणे बरसलाच नाही. अशा स्थितीत जीवघेण्या उकाड्याने त्रस्त नाग्रीकांना मंगळवारी पावसाने लावलेल्या हजेरीने तात्पुरता का होईना दिलासा मिळाला
मुंबई सह मॉन्सूनच्या पावसाने राज्य व्यापले. मराठवाडा, विदर्भातही पाऊस सुरू झाला. मात्र, उत्तर महाराष्ट्राला अद्याप पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
आर्द्रता, उकाडा वाढला
तुरळक पावसाने पुन्हा उकाड्यात वाढ झाली. गेल्या आठवड्यापासून मॉन्सूनची वर्दी देणारे ढग आकाशात जमा होत आहेत. वातावरणातील आर्द्रताही वाढली आहे. त्यामुळे उष्म्याने त्रस्त नागरिकांना उकाड्यानेही हैराण केले आहे.
तुरळक पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण होण्याऐवजी उकाडा वाढला. त्यामुळे जिल्ह्यात आणखी दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. एखाद्या भागापुरता नव्हे, तर सार्वत्र पाऊस पडण्याची वाट शेतकऱ्यांसह नागरिक पाहत आहेत.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा