ठाण्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश ; आरोपीला अटक करत पोलिसांनी दोन महिलांची केली सुटका
शरण खन्ना – ठाणे जिल्हा प्रतिनिधी
ठाणे :- ठाणे पोलिसांनी ठाणे शहरात एक मोठी कारवाई केली आहे. शहरात सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. एका स्पा सेंटरमध्ये हे रॅकेट सुरू होतं. पोलिसांनी या स्पा सेंटरवर धाड टाकून कारवाई केली आहे. या प्रकरणी स्पा सेंटरच्या व्यवस्थापकाला पोलिसांनी अटक केली आहे. तर दोन महिलांची सुटका केली आहे.
मॉलमध्ये असलेल्या थाई स्पा सेंटरमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती ठाणे पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी त्या स्पा सेंटरमध्ये एक डमी ग्राहक पाठवला. यावेळी डमी ग्राहकाला स्पामधील व्यक्तीने एका सेशनसाठी पाच हजार रुपये देण्यास सांगितले आणि डील फायनल झाली. त्यानंतर डमी ग्राहकाने पोलिसांना कळवले आणि मग पोलिसांनी स्पा सेंटरवर धाड टाकली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळावरुन दोन महिलांची सुटका केली आहे. या ठिकाणी महिलांचा वेश्या व्यवसायासाठी वापर केला जात होता. पोलिसांनी दोन्ही महिलांची सुटका केली तर स्पा व्यवस्थापकाला अटक केली आहे. या प्रकरणी कासारवडवली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.
तीन दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने एक मोठी कारवाई करत सेक्स टुरिझमचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी मुंबई क्राईम ब्राँचने दोन महिला दलालांना अटक केली आहे. तर दोन तरुणींची सुटका करण्यात आली आहे. आरोपी महिला ही दोन तरुणींना घेऊन मुंबई विमानतळावर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली.



