आपल खान्देश

पाचोरा रेल्वे पुलाजवळ अपघातात मोटरसायकलस्वार जागीच ठार एक जखमी

पाचोरा शहरातील बायपास वरुन जाणारा हायवे रोड जेवढा सोयीचा तितकाच मृत्यू चा सापळा झाला असून मृत्यू ची शृंखला या रस्त्यावर झाली आहे.


पाचोरा (प्रतिनिधी) – येथील पाचोरा – भडगाव रोडवरील रेल्वे पुलाजवळ अपघातात मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला तर एक जखमी झाला आहे. या घटनेची वार्ता शहरात पसरताच हळहळ व्यक्त होत आहे.

शहरातील बायपास वरुन जाणारा हायवे रोड जेवढा सोयीचा तितकाच मृत्यू चा सापळा झाला असून मृत्यू ची शृंखला या रस्त्यावर झाली आहे. आज सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास गाडगेबाबा नगर परीसरात मिस्तरी काम करुन मयत नईम खान युनुस खान (२४) हा आपल्या मोटरसायकलवर घराकडे जात असताना रेल्वे पुलाकडन भडगाव कडे जाणार्‍या वाहनाने जोरदार धडक दिली यात युनुस हा जागीच ठार झाला तर त्याच्या सोबत तालुक्यातील जोगेतांडा येधील बिगारी संतोष हेमराज चव्हाण (२१) हा गंभीर जखमी झाला आहे. जखमीला येथील एका हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. मयत हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा खंदा कार्यकर्ता होता ही बातमी कळताच कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, अल्पसंख्यक जिल्हा सचिव इरफान मनियार आदींनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली यावेळी सचिन सोमवंशी यांनी दुःख व्यक्त करत येणाऱ्या २९ डीसेंबर च्या पाचोरा तालुका मेळाव्यात नईम खान यांना नियुक्ती पत्र देण्यात येणार होते. मयत नईम खान यांस एक लहान मुलगी आहे बाहेर पुरा भागातील असंख्य लोक ग्रामीण रुग्णालयात उपस्थित होते

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे