आपल खान्देशकृषीवार्ताब्रेकिंग

बदलत्या हवामानाच्या परिणामामुळे मोसंबी उत्पादकांना मोठा फटका; फळगळ झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान..

पाचोरा तालुक्यातील मोसंबी बागायतदार संकटात :तात्काळ पंचनामे करण्याची कॉग्रेसची मागणी 


Jalgaon | जळगाव जिल्ह्यात बदलत्या हवामानाच्या परिणामा मुळे  मोसंबीची फळगळ झाल्याने लाखो रुपयांचा फटका बसुन शेतकर्‍यांच्या तोडांत येणार घास खाली पडल्याचे दिसून आले आहे. शेतकरी हवालदिल झाला असून, राज्य शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी काँग्रेसने केली आहे

पाचोरा तालुक्यातील फळ बागेतील मोसंबी ला वर्षे भर लावलेला खर्च आणि उत्पन्न त्यातच पडलेला भाव यात खुप मोठी तफावत दिसून येत आहे. त्यामुळे सर्वच मोसंबी शेतकरी संकटात सापडलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या तलाठी कडे आपल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी अर्ज करावा अन्यथा आमच्याशी संपर्क करावा जेणेकरून महसूल विभागाला पंचनामे करण्यासाठी भाग पाडु असे आवाहन काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी केले आहे.

मोसंबी या फळा पासुन सी व्हीटॅमीन जरी मानवाला मिळत असेल तरी जर शासनाने अर्थरुपी मदतीचे व्हीटॅमीन शेतकऱ्यांना दिले नाही तर मोसंबी बागा उपटून फेकल्या शिवाय पर्याय राहणार नाही असे श्री सोमवंशी यांनी शेवटी सांगितले. महसूल विभागाने तातडीने पंचनामे करावे अन्यथा शासनाना विरोधात सनदशीर मार्गाने आंदोलन करावे लागेल असा इशारा शेवटी दिला आहे.

 


 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे