आपल खान्देश

उत्तर महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळ स्थापन करावा, शासनाने प्रकल्पांसाठी निधी देवून खान्देश दुष्काळ मुक्त करावा – विकास पाटील

धुळे (झूम मराठी वृत्त) उत्तर महाराष्ट्रातील नदीजोड प्रकल्पांतर्गत अपुर्ण, प्रलंबित व प्रस्तावित जलसिंचन प्रकल्प पुर्णत्वास नेण्यासाठी केंद्रसरकारचं जलशक्ती मंत्रालय, केंद्रीय जल आयोग व राज्य सरकारचं जलसंपदा मंत्रालय यामध्ये सुसंवाद, सुसंपर्क व सुसमन्वय असणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच उत्तर महाराष्ट्र जल परीषदेने गावागावात, घराघरात व मनामनात लोकांमध्ये जनजागृती व जनजागरण करणेसाठी, जनआंदोलन व जनलढा उभारण्यासाठी आणि जलदूत व जलप्रेमी मार्फत जलसाक्षरतेचा प्रचार व प्रसार करणेसाठी धुळ्यात जल परीषदेचं आयोजन करण्यात आले होते.

 

पाणी हे परीसच नव्हे तर पाणी हे तुम्हांआम्हां सर्वांचं जीवन आहे. तापी खोरे, गिरणा खोरे व नार पार खोरे हे तिन्ही खोरे म्हणजे ४०० टिएमसी हून अधिक पाणलोट व जलस्रोताचं क्षेत्र आहे. हे तीनही खोरे उत्तर महाराष्ट्राची जीवनदायीनी (लाईफलाईन) ठरणार आहेत.ह्या तीनही खो-यांमध्ये ५० हून अधिक लहान मोठ्या नद्यापैकी काही नद्या पुर्ववाहिनी तर काही नद्या पश्चिम वाहिनी आहेत. तापी खो-याच्या सातपुडा डोंगर रांगेतील सूर्यकन्या तापी, अरुणावती, आनेर, बोरी, वाघुर, उमरी, सुसरी व गोमाई या पश्चिम वाहिनी तर गिरणा, पांझरा, मोसम, बुराई या पुर्ववाहिनी नद्या आहेत. पेठ सुरगाणा अर्थात सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील नार,पार,तान,मान,औरंगा, अंबिका अशा १९ हून अधिक नद्या पश्चिम वाहिनी आहेत. त्यापैकी तापी खोरं हे खचदरीचं अर्थात खोलदरीचं खोरं आहे तर गिरणा खोरं अतीतुटीचं खोरं आहे आणि नारपारचं खोरं हे अतीवृष्टीचं खोरं आहे.अतिवृष्टीच्या नार-पार खो-यातील पाणी अतीतुटीच्या गिरणा खो-याकडे वळविणे हाच उत्तर महाराष्ट्र जलसंपन्न व जलसमृध्द करणेसाठी प्रभावी व रामबाण ठरेल. या तीनही खो-यासाठी एकात्मिक नदीजोड प्रकल्पांतर्गत बारमाही मोठ्या नद्या लहान नद्यांना व लहान नद्या अती लहान नद्यांना जोडल्यास कायमस्वरूपी अवर्षणग्रस्त वा दुष्काळग्रस्त हे उत्तर महाराष्ट्रासाठी नवसंजीवनी देणारा प्रयोग ठरेल यांत तिळमात्र शंका नाही. फक्त गरज आहे ती सुयोग्य नियोजनाची,तीव्र राजकीय इच्छाशक्तीची व आक्रमक सातत्यपुर्ण जनरेट्याची, जनलढ्याची व जनसमर्थनाची उत्तर महाराष्ट्राच्या सर्वांगीण व संतुलित विकासासाठी जलक्रांती, कृषीक्रांती व उद्योगक्रांती ही त्रिसूत्रीच फलदायी ठरेल. त्यामुळे सुजलाम् सुफलाम् उत्तर महाराष्ट्र हेच उत्तर महाराष्ट्र जल परीषदेचं अंतिम उध्दिष्ट आहे.उत्तर महाराष्ट्रातील नदीजोड प्रकल्पांतर्गत अपुर्ण,प्रलंबित व प्रस्तावित जलसिंचन प्रकल्प पुर्णत्वास नेण्यासाठी केंद्रसरकारचं जलशक्ती मंत्रालय, केंद्रीय जल आयोग व राज्य सरकारचं जलसंपदा मंत्रालय यामध्ये सुसंवाद, सुसंपर्क व सुसमन्वय असणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच उत्तर महाराष्ट्र जल परीषदेने गावागावात,घराघरात व मनामनात लोकांमध्ये जनजागृती व जनजागरण करणेसाठी, जनआंदोलन व जनलढा उभारण्यासाठी आणि जलदूत व जलप्रेमी मार्फत जलसाक्षरतेचा प्रचार व प्रसार करणेसाठी धुळे शहरात जल परीषदेचं आयोजन केलं होते.

  • नाशिक जिल्ह्याच्या उत्तर भागाची भाग्यरेषा असणाऱ्या नार-पार योजनेंतर्गत मांजरपाडा-१ प्रकल्प, वांजुळपाणी योजना, नार-पार-गिरणा नदी लिंक प्रकल्प जोडणे.
  • जळगाव, जिल्ह्यासाठी उर्ध्व तापी अर्थात हातनूर धरणाचं पुर्ण क्षमतेने भरण्यासाठी गाळ काढणे व उजव्या कालव्याप्रमाणे डाव्या कालव्याची बांधणी करणे.
  • वरखेड-लोंढे,शेळगांव बॅरेज बॅरेज व सुलवाडे-जामफळ यांचा समावेश बळीराजा संजीवनी प्रकल्पात समावेश करुन अतिरिक्त हक्काच्या व हिश्याच्या पाण्याचा सौर तंत्रज्ञानाचा व बंदिस्त पाईपलाईनचा वापर करुन कायमस्वरूपी रिझर्व्हरसची निर्मिती करणे.
  • निम्न तापी प्रकल्प पाडळसरे, शेळगाव,सुलवाडे, सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजस प्रकल्पांतर्गत जळगांव जिल्ह्यातील १४ धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील २२ जल उपसासिंचन योजनांसाठी सौर तंत्रज्ञानाचा, बंदिस्त पाईपलाईनचा आणि तुषार सिंचन व सूक्ष्म ठिबक सिंचन संचाचा वापर केल्यास शुन्य वीजबील व शतप्रतिशत पाणीबचत होईल.
  • गिरणा नदीवरील अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त ७ बलून बंधारे शेकडो गावांची पाणीटंचाई दूर करणारे, भाग्यरेखा ठरणारे प्रकल्प पुर्ण करणे.
  • तापी-बुराई नदी जोड प्रकल्पाचं अग्रक्रमाने कार्यान्वयन करणे.                 
  • तापी नदीचं महाराष्ट्राच्या वाट्याचं १९१.४० टिएमसी अडविणं, जिरविणं, साठवणं वापरणं गरजेचं आहे. त्यासाठी महत्वाकांक्षी उकाई धरण ते मोसम नदी लिंक प्रकल्पाचं आणि उकाई धरण ते पांझरा नदी लिंक प्रकल्पाचं सर्वेक्षण व सूक्ष्म अभ्यास करणे,सुधारित प्रशासकीय मान्यता देणे व आवश्यक व पुरेशा निधीची उपलब्धता करणे.
  • नर्मदा नदीतील महाराष्ट्राच्या हिश्याचं व हक्काचं १०.२५ टिएमसी सरदार सरोवराच्या ब्याक वॉटर क्षेत्रातून पाणी सातपुडा डोंगरातील बोगद्याद्वारे व नैसर्गिक उताराद्वारे बडवाणी मार्गे नर्मदा नदी ते गोमाई नदी लिंक करुन मालकातर धरण व रहाट्यावड धरणाद्वारे सुलवाडे ब्यारेज मध्ये आणल्यास तापी नदीच्या उत्तरेकडील सातपुडा डोंगर रांगाच्या दक्षिणेकडील शिरपूर, शहादा, शिंदखेडा, तळोदा, नवापूर व नंदुरबार तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्र शेतीसिंचनाखाली येईल.
  •  शहादा तालुक्याच्या पुर्वेकडील असणारं रहाट्यावड धरण हे ब्रिटिश काळापासून मंजुर असलेलं धरणाचं काम निधीअभावी व पाठपुराव्या अभावी आजही कासवाच्या संथ गतीने सुरु आहे.

त्यामुळे पाणीटंचाईचं व भिषण संकट कायमच उभं राहत आहे…! उपरोक्त महत्वाकांक्षी प्रकल्पांसाठी शासनाने जागतिक बँक,खुल्या बाजारतून वा वॉटर बाँडच्या माध्यमातून मेट्रो प्रकल्पाच्या व समृद्धी महामार्ग प्रकल्पाच्या धरतीवर निधी उभारावा.शेतकरी वर्गास चोवीस तास पाणी व वीज हवी.सिंचनासाठी शेतकरी वर्गाकडून सिंचन कराच्या माध्यमातून कर संकलन करुन प्रकल्पाची दुरुस्ती,देखबाल व प्रकल्प खर्च भागवावा.जलक्रांतीतून कृषीक्रांतीकडे व कृषीक्रांतीकडून अर्थक्रांतीकडे व अर्थक्रांतीकडून औद्योगिक क्रांतीकडे मार्गक्रमण सुरु झाल्यास शेतकरी कर्जमुक्त, अनुदानमुक्त व आत्महत्यामुक्त होईल.संपन्न कुटुंब,संपन्न समाज व समृद्ध राष्ट्र निर्मितीचं स्वप्न साकार होईल हेच उद्देश पाणी परिषदेचे आहॆ.

उत्तर महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळ स्थापन करावा, शासनाने प्रकल्पांसाठी निधी देवून खान्देश दुष्काळ मुक्त करावा.- विकास पाटील


बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे