आपल खान्देशब्रेकिंग

बैलगाडी पुराच्या पाण्यात वाहून शेतकरि बेपत्ता!

पुरात बैलांचा बुडून मृत्यू झाला. वाहून गेलेले भागवत पाटील हे बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे. संपूर्ण गावकरी भागवत भिका पाटील हे सुरक्षित असावे यासाठी प्रार्थना करत आहेत. भागवत यांचा शोधासाठी पोलिसांसह आख्ख गाव शोध मोहिम राबवत आहे.

धरणगाव (जळगाव): मुसळधार पावसामुळे नाल्याला आलेल्या पुरामुळे शेतातून बैलगाडीने घरी परतणारं एक दाम्पत्य पुराच्या पाण्यात वाहून गेले. ही धक्कादायक घटना आज (15 जुलै) सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील निंभोराच्या खैरी नाल्यात घडली. यात बैलगाडीतील महिला बचावली आहे, मात्र पती पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं बेपत्ता झालाय. बैलगाडीच्या दोन्ही बैलांचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला. बेपत्ता झालेल्या शेतकऱ्याचा रात्री उशिरापर्यंत शोध लागला नाही.

भागवत भिका पाटील (वय 55) आणि त्यांच्या पत्नी मालुबाई भिका पाटील (वय 50) असं या शेतकरी दाम्पत्याची नावं आहेत. निंभोरा येथील रहिवासी असलेले हे दोघे गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या शेतात गेले. दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास निंभोरा परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पाटील दाम्पत्य बैलगाडीने घरी परतत होते. याच वेळी मुसळधार पावसामुळे निंभोरा ते खामखेडा या दोन्ही गावांच्या दरम्यान असलेल्या खैरी नाल्याला मोठा पूर आला. नाल्याच्या पुराचा अंदाज न आल्याने भागवत पाटील यांनी बैलगाडी नाल्यात उतरवली. मात्र, नाल्याला आलेला पूर मोठा असल्याने बैलगाडी पुराच्या पाण्यात वाहून गेली.

या घटनेत मालुबाई पाटील या बचावल्या आहेत. पुराच्या पाण्यात बैलगाडी वाहून गेल्यानंतर त्या नाल्याच्या काठावर असलेल्या झुडुपांमध्ये अडकल्या. मात्र, भागवत पाटील व दोन्ही बैल पाण्यात दूरपर्यंत वाहत गेले. त्यामुळे दोन्ही बैलांचा बुडून मृत्यू झाला. वाहून गेलेले भागवत पाटील हे बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे. संपूर्ण गावकरी भागवत भिका पाटील हे सुरक्षित असावे यासाठी प्रार्थना करत आहेत. भागवत यांचा शोधासाठी पोलिसांसह आख्ख गाव शोध मोहिम राबवत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे