संत सेना महाराज नाभिक समाज विकास मंडळाचे वतीने जिवाजी महाले जयंती उत्साहात
झूम मराठी | डिजिटल
भडगाव (प्रतिनिधी) श्री. संत सेना महाराज नाभिक समाज विकास मंडळाचे वतीने शिवरत्न जिवाजी महाले यांची ३८७ वी जयंती साजरी करण्यात आली. नाभिक समाज मंदीरात झालेल्या कार्यक्रमात सुरुवातीला जेष्ठ समाज बांधव दयाराम ठाकरे व मंडळाचे अध्यक्ष संजय पवार यांच्या सह उपस्थित समाज बांधवाचे हस्ते शिवरत्न जिवाजी महाले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी जेष्ठ मार्गदर्शक एस. डी. न्हावी, समाज अध्यक्ष संजय पवार यांनी शिवाजी महाराज यांचे अंगरक्षक जिवा महाले यांच्या जीवनचरीत्र, पन्हाळगडावरील कर्तृत्व या विषयी माहिती दिली.
यावेळी पत्रकार सुधाकर पाटील यांना डाॕ. नानासाहेब परुळेकर पुरस्कार मिळाल्याने त्याचा सत्कार मंडळाचे अध्यक्ष संजय पवार, चेअरमन दयाराम ठाकरे, एस. डी. न्हावीसर, पोपटराव नेरपगारे, नारायण निकम आदि जेष्ठ मान्यवरासह उपाध्यक्ष रविद्र शिरसाठ, सचिव अॕड. भरत ठाकरे, दिपक शिरसाठ, सुभाष ठाकरे, भरत चव्हाण, हिलाल नेरपगारे सह कार्यकारणी सदस्य यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास नाभिक विकास मंडळचे अध्यक्ष संजय पवार (पत्रकार), उपाध्यक्ष रविद्र शिरसाठ सचिव अॕड भरत ठाकरे, खजिनदार दिपक शिरसाठ, कार्य कारिणी सदस्य नारायण नेरपगारे, सुभाष ठाकरे, दिलीप शिरसाठ, सुर्यभान वाघ, कीशोर निकम, संपर्क प्रमुख भरत चव्हाण, राकेश शिरसाठ, हिलाल नेरपगारे, एस. डी. न्हावी सर, पोपटराव नेरपगारे, नारायण निकम, निलेश महाले व विजय पवार, कैलास वेळीस तसेच चर्मकार संघाचे तालुकाध्यक्ष रवि अहिरे सह आदी उपस्थित होते.



