ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकीय

देवेंद्र फडणवीस भेटीसाठी शरद पवारांच्या घरी, सिल्व्हर ओकवर…

विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतली.

दिलीप परदेशी

31/05/2021   सोमवार

मुंबई विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतली. पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक इथे जाऊन फडणवीस शरद पवारांना भेटले. स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली.

माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते श्री शरद पवारजी यांची आज त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली, असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीपूर्वी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन ओबीसी आरक्षणावरुन महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. या पत्रकार परिषदेनंतर लगेचच देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांची भेट घेतली. ही केवळ सदिच्छा भेट असल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे.

 

जाहिराती =——————————–

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे