धुळ्यातील देवराज पाटील यांची यु पी एस सी मध्ये निवड.
धळे(झूम मराठी) अभिमानास्पद नुकत्याच भारतीय लोकसेवा आयोगाच्या झालेल्या लेखी व तोंडी परीक्षेत धुळे येथील देवराज मनिष पाटील यांची ४६२ रैंक मध्ये निवड होऊन भारतीय विदेश सेवा मध्ये निवड झाली आहे.
विशेषतः देवराज पाटील याने खाजगी कोठेही शिकवणी अगर कोणाच्याही मार्गदर्शनाखाली अभ्यासाची तयारी न करता, स्वयंअध्ययनाने भारतीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करुन यशस्वी झाला आहे.
त्यांचे मुळगाव वाडे ता भडगाव जिल्हा जळगाव जिल्ह्यातील असुन त्याचे वडील श्री मनिष पाटील हे अण्णासाहेब द वा पाटील शैक्षणिक संस्थेत चित्रकला शिक्षक आहेत. देवराज यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जयहिंद शैक्षणिक संस्थेत झालेले आहे, तसेच शासकीय तंत्रनिकेतन धुळे येथुन अभियांत्रिकी पदविका घेऊन मार्डन महाविद्यालय पुणे येथुन अभियांत्रिकी मध्ये पदवी प्राप्त केली आहे. त्यांच्या या सर्वाच्च यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहॆ



