ओबीसी समाजांच्या मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी सेल’चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते रस्त्यावर
केंद्र सरकारच्या विरोधी धोरणाविरूध्द राज्यस्तरीय धरणे आंदोलन व रस्त्यावर जोरदार प्रदर्शन
कार्यकारी संपादक निलेश पाटील

जळगाव प्रतिनिधी :राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव ओबीसी सेल द्वारा आयोजित आकाशवाणी चौक येथे दोन तास ओबीसी समाजांचे मागणीसाठी धरणे आंदोलन व प्रदर्शन करण्यात आले आहे.
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी चे ओबीसी महिला पदाधिकारी व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वंदनाताई चौधरीसह ओ बी सी सेल जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे , युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, वाल्मीक पाटील, अशोक पाटील, अशोक लाड हे उपस्थित होते.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा