मी फक्त पक्षात प्रवेश करत नाहीय, महान विचारधारेचा भाग होतोय म्हणत भुवनेश दुसाने यांचा शिवसेनेत प्रवेश..
Pachora पाचोरा शहरातील नामांकित व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेले पत्रकार भुवनेश दुसाने यांनी येथे आयोजित भव्य नागरी सत्कार सोहळाच्या कार्यक्रमांमध्ये पाचोरा विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर आप्पा पाटील प्रमुख यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे. यामुळे पंपिंग रोड परिसरात अधिक बळकटी मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
पाचोरा पंपिंग रोड परिसरात पक्ष प्रवेश कार्यक्रमात शिवसेनेचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या उपस्थितीत भुवनेशभाऊ दुसाने यांच्या सह परिसरातील तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने शहरातील पंपिंग रोड परिसरात शिवसेनेला पुढे फायदा होईल असे निश्चित आहे. या पक्ष प्रवेशोत्सव कार्यक्रमात परिसर भगवे झाल्याचे दिसून येत होते. भुवनेशभाऊ दुसाने यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने परिसरातील स्थानिक नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत होते.
पत्रकार भुवनेशभाऊ दुसाने यांचा पत्रकारिता क्षेत्रात दांडगा अनुभव आहे, या अनुभवाच्या माध्यमातून राजकीय काम चांगल्या प्रकारे करू शकतील, भुवनेशभाऊ दुसाने यांना पक्ष कोणती जबाबदारी देतील हे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
या प्रवेशोत्सव सोहळामुळे परिसरात विकसीत होण्यास मदत होईल आणि शिवसेनेचे वर्चस्व राहील असे दिसत आहे. किशोरआप्पा पाटील यांच्या विजन द्वारे रस्ते, पाणी, आरोग्य सुविधा वेग घेतल्या असून शहरातील रस्ते, गटारी, ओपन स्पेस सुशोभीकरण, सोलर लाईट यसुविधा मिळाल्या त्यामुळे हा प्रवेशोत्सव म्हणजे आशेचा किरण, पंपिंग रोड विकासाचा महामार्ग बनेल असे मत नागरिकांचे होते तरुण व महिला गटांनी स्वागत सभा घेतल्या गेल्याने उत्साह भरभरून वाहत होता.
राजकीय पाऊल नसून, वैचारिक एकात्मतेचा भव्य क्षण!, या प्रवेशाने स्थानिक नागरिकांमध्ये उत्साहाची लहर उसळली आणि विकासाच्या नव्या क्षितिजं उघडली जातील भुवनेश दुसाने यांच्या सोबत मोठया संख्येने तरुणांनी पक्ष प्रवेश केला. यावेळी आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या समवेत उपजिल्हाप्रमुख किशोर बारावकर, शहरप्रमुख सुमित सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. परिसरातील निलेशभाऊ मराठे, हेमंतभाऊ चौधरी, भरत भैरू यांनी आमदार किशोर आप्पा यांचा सत्कार केला.
“मी फक्त पक्षात प्रवेश करत नाही… महान विचारधारेचा भाग होतोय, किशोरआप्पा पाटील यांच्या स्मार्ट सिटी व्हिजन व जनकल्याण लढाईने प्रेरित. पंपिंग रोडला नवे रंग, स्वप्न व यश मिळवून देण्याचा संकल्प – भुवनेश दुसाने यांनी आपले मतव्यक्त करतांना प्रसार माध्यमातून सांगितले.



