देश-विदेश

‘पतंजलि’च्या खाद्यतेलात भेसळीची तक्रार, राजस्थानात कारखाना सील

ऐलोपॅथी उपचारांवर टीका केल्याप्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशननं (आयएमए) १ हजार कोटींचा मानहानीचा दावा ठोकल्यानंतर योगगुरू बाबा रामदेव आता राजस्थान सरकारच्या निशाण्यावर आले आहेत. राज्यस्थान सरकारकडून काल रात्री उशिरा ‘पतंजलि’च्या कारखान्यावर धाड टाकण्यात आली. यावेळी मोहरीच्या तेलात भेसळ करण्यात येत असल्याचं उघडकीस आलं आहे. यापार्श्वभूमीवर ‘पतंजलि’चा अल्वर येथील खाद्यतेल कारखाना सील करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या कारवाईचं व्हिडिओ चित्रिकरणसुद्धा करण्यात आलं आहे.

याआधी बाबा रामदेव यांची कंपनी असलेल्या पतंजलिकडून उत्पादन केल्या जाणाऱ्या मोहरीच्या तेलावर खाद्य तेल उद्योग संघटनेनं (एसईए) देखील आक्षेप घेतला होता. एसईएनं ‘पतंजलि’च्या जाहिरातीवर आक्षेप घेतला होता. ज्यात इतर कंपन्यांच्या तेलात भेसळ असल्याचा दावा पतंजलिकडून करण्यात येत होता. दरम्यान, राजस्थानच्या अल्वर जिल्ह्यातील खैरथलमध्ये पतंजलि ब्रँडच्या मोहरी तेलाच्या उत्पादन प्रकल्पात तेलाचं पॅकेजिंग आणि भेसळ केली गेल्याची माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली. प्रशासनाकडून सिंघानिया आयल मिलवर छापा मारला आणि कारखाना सील करण्यात आला. कारखान्यात ‘पतंजलि’चे पॅकेट्स मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे