आपल खान्देशमहाराष्ट्र

महावितरणाच्या अभियंत्याला खुर्चीला बांधणाऱ्या भाजप आमदार मंगेश चव्हाण ह्यांना अटक

जळगाव – राज्यात लॉकडाऊनच्या काळात आलेल्या वाढीव वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरणने आता वीजबिल वसुली सुरू केली आहे. जे लोक वीजबिल भऱत नाहीत त्यांची वीज कापण्यात येत आहे. पण या कारवाईमुळे नागरिकांमध्ये संताप आहे. जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांचे थकलेले वीजबील भरलं नाही यामुळं वीज कापल्याच्या निषेधार्थ चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी महावितरणचे अभियंता फारुख शेख यांना कार्यालयात खुर्चीला दोरीने बांधलं. त्यानंतर आमदार तसेच आंदोलकांनी खुर्चीसह अभियंत्याला उचलून कार्यालयाबाहेर बाहेर आणलं.

याबाबत संबंधित अभियंत्याने पोलिसात तक्रार केल्यानंतर भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शेतकऱ्यांचं नुकसान होतंय आणि ही वेळ सरकारने आणली आहे अशी टीका आमदार मंगेश चव्हाण यांनी केली. शेतकऱ्यांचे रब्बीचे पीक उभं असतांना महावितरणचे कर्मचारी वीज कट करत असल्याने मोठया प्रमाणात शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्याने अभियंत्यांना शेतकरी आंदोलकांनी दोरीने बांधलं, असे त्याचे म्हणणे आहे. महावितरणच्या अभियंत्याला दोरीने बांधले अशी तक्रार आल्याने आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह काही आंदोलकांना ताब्यात घेतल्याचं जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण मुंडे यांनी सांगितले आहे

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे