आपल खान्देश

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना दिलीपभाऊ वाघ यांनी भेट घेऊन नुकसानग्रेस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी निवेदन केले.

भडगाव (प्रतिनिधी) राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय नामदार जयंत पाटील साहेब तालुक्यात नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आले असता पाचोरा भडगावचे माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी भेट घेऊन नुकसानग्रेस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी निवेदन केले.

चाळीसगाव तालुक्यातील झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे चाळीसगाव तालुक्यातील तालुक्यातील पूरग्रस्त भागातील गावात झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय नामदार जयंत पाटील साहेब आले असता भडगाव पाचोरा मतदार संघातील गावात तितुर नदीमुळे नदीकाठच्या गावात जवळपास पाचशे हेक्टर च्या वर जमीन वाहून गेली असून, नगरदेवळा पूल दोन्ही बाजूचा भराव,कजगाव येथील केटी बंधाऱ्या च्या दोघं बाजूस भराव वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी व बंधाऱ्याचे काम करण्यासाठी आणि कजगाव गावास नदीकाठी संरक्षण भिंत बांधण्यासाठी कार्यवाही करण्यात यावी याबाबतचे निवेदन भडगाव पाचोरा मतदार संघाचे माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांच्या उपस्थित विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन दादा तावडे,तालुकाध्यक्ष राहुल पाटील, कार्याध्यक्ष हर्षल पाटील, युवक तालुकाध्यक्ष स्वप्नील पाटील, गोपी पाटील आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत देण्यात आले असून त्यावर तात्काळ कार्यवाहीच्या सूचना माननीय मंत्री महोदयांनी संबंधित विभागास दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे