आपल खान्देश

बैल पोळ्यासाठी पाचोऱ्याची बाजरपेठ सजली

झूम मराठी पाचोरा | अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या बैलपोळ्याच्या खरेदीला शेतकऱ्यांकडून सुरुवात झाली आहे. आज शनिवारचा आठवडे बाजार असून, पाचोरा शहरातील बाजारपेठ जनावरांच्या साज-सामानाने सजली आहे. शेतकऱ्यांचा मित्र असलेल्या बैलांशी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण आहे

भारतीय संस्कृतीनुसार श्रावणात सण, उत्सवाची उधळण होत असते. नागपंचंमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी यांच्यासह पोळा हा सण ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पोळ्यानिमित्त  बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर विविध वस्तू विक्रीसाठी आल्या आहेत. त्यामध्ये बैलांसाठी निरन‌िराळे गोंडे, मातीचे बैल, रंग आणि घुंगुरुच्या माळानी दुकानेही सजली आहेत.

वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांचा एकमेव सण अर्थात पोळा सोमवारी आहे. आपल्या लाडक्या बैलांवर जीवापार प्रेम करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही हा सण अत्यंत जिव्हाळ्याचा असतो. दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या या सणानिमित्ताने बैलांच्या सजावटीच्या साहित्यांनी बाजारपेठ सजली आहे. दरम्यान, इंधनासह अन्य वस्तूंमध्ये झालेल्या दरवाढीचा परिणाम या साहित्याच्या दरावरही झाला असून कासरा, वेसण, बाशिंग आदी वस्तूच्या किंमती वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांचा एकमेव सण अर्थात पोळा. पोळ्याची दिवशी निघाणाऱ्या मिरवणूकीत, आपला सर्जाराजा अधिक ऐटीत व रुबाबदार दिसावा, यासाठी सारेच शेतकरीराजा दरवर्षीच कसोशीने प्रयत्न करतात. करोनाचे सावट, त्यात चाळीसगाव पाचोरा भडगावात झालेली अतिवृष्टी अशी परिस्थिती असली तरी वर्षभर शेतात राबणाऱ्या आपल्या लाडक्या बैलांसाठी हा सण उत्साहात साजरा व्हावा म्हणून शेतकऱ्यांनी जय्यत तयारी केल्याचे चित्र आहे. शेतात सोने उगविण्यासाठी काबाडकष्ट करणाऱ्या आपल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा या सणानिमित्ताने पाचोऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील दुकाने विविध सजावटीच्या साहित्यांनी सजली आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे