ब्रेकिंग

हतनूर धरणाचे 14 दरवाजे उघडले! तापी नदीपात्रात विसर्ग सुरू..

हतनूर धरणाचे 14 दरवाजे उघडले! तापी नदीपात्रात विसर्ग सुरू..

जळगाव जिल्ह्याच्या भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाच्या मध्य प्रदेश व विदर्भातील पाणलोट क्षेत्रात जोरदार झालेल्या पावसामुळे धरणात पाण्याची पातळी २१०.६९० मीटर वाढली आहे. मंगळवारी रात्री नऊ वाजे दरम्यान एकूण २२१.६० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आणि ५७.११ टक्के साठा झाला होता.

त्यामुळे धरणाचे १४ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले होते. दुपारी दोननंतर सहा दरवाजे बंद करण्यात आले असून, आठ दरवाजे दीड मीटरने उघडे असून, नदीकाठच्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन पाटबंधारे विभागासह जिल्हा प्रशासनाने केले आहे. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील मध्य प्रदेशातील देडतलाई व टेक्सा, तर विदर्भात संततधार सुरू असल्याने हतनूर धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. यामुळे मंगळवारी रात्री एकला धरणाच्या १४ दरवाज्यांमधून २७१५७ क्यूसेक पाणी तापी नदीपात्रात सोडण्यात आले.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे