आपल खान्देश

पाचोरा Live – सुवर्णा महाजन (पाटील)यांना ‘रविंद्रनाथ टागोर सेवा रत्न पुरस्कार’ जाहीर

पाचोरा Live 24, (प्रतिनिधी) पाचोरा येथील सावित्रीबाई परशराम शिंदे शाळेतील शिक्षिका सुवर्णा विठ्ठल महाजन (सुवर्णा जितेंद्र पाटील) यांना मा.न.म. फाऊंडेशन, आंध्रप्रदेश व नाथनायग्रुप, तामिळनाडू यांच्यातर्फे संयुक्तरित्या “रविंद्रनाथ टागोर सेवा रत्न” पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सुवर्णा पाटील यांनी रांगोळी कला क्षेत्रात केलेल्या सामाजिक कार्याबद्दल त्या या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत.

शिक्षणाची वारी’ या विभागीय कार्यक्रमात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात त्यांनी काढलेल्या रांगोळ्या खूप लोकप्रिय ठरल्या. या कार्यक्रमाला हाजारो शिक्षक व विद्यार्थ्यानी भेट दिली होती. त्यात त्यांच्या रांगोळ्यांचे खूप कौतुक झाले, “बहिणाबाईंची हुबेहूब पोट्रेट रांगोळी” आकर्षणाचा विषय ठरली

सध्या कोरोना परिस्थिती पाहता हा पुरस्कार आॅनलाईन पध्दतीने सुवर्णा पाटील यांना देण्यात येणार आहे. त्यांना आत्तापर्यंत गिरणा गौरव प्रतिष्ठान, नाशिक यांचेतर्फे देण्यात येणारा “साने गुरुजी आदर्श शिक्षिका पुरस्कार”, धुळे वेल्फेअर असोसिएशनतर्फे “आदर्श कलाध्यापक पुरस्कार”, अजिंठा आर्ट अकादमी, सांगोलातर्फे “कलाश्री पुरस्कार”, क्षितिज फाऊंडेशन, मुंबईतर्फे देण्यात येणारा “असपायरिंग वूमन – २०२० पुरस्कार” असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. सुवर्णा पाटील यांनी आत्तापर्यंत रांगोळी या माध्यमातून मतदान जनजागृती, ग्राम स्वच्छता अभियान जनजागृती, कोरोना जनजागृती, शहिद जवान श्रद्धांजली रांगोळी, मराठी राजभाषा दिन, दसरा दिवाळी शुभेच्छा, मराठी नववर्ष स्वागत, बेटी बचाओ बेटी पढाओ, अशा विविध सामाजिक रांगोळ्या या पाचोरा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक, छत्रपती संभाजी राजे चौक, रेल्वे स्टेशन, बस स्टॅण्ड, एम. एम. कॉलेज चौक अशा विविध सार्वजनिक ठिकाणी स्वखर्चाने, तर कधी कधी विविध संस्थेच्या माध्यमातून रांगोळ्या काढून जनजागृती व संदेश दिले आहेत. त्यांनी रांगोळी सोबतनृत्य, गायन, अभिनय यातही खूप बक्षिसे मिळवली आहेत. जळगाव येथे झालेल्या “सम्राज्ञी खान्देशची – २०२०” या स्पर्धेत सिटी क्विन आॅफ खान्देश हा किताब मिळाला आहे .तसेच रांगोळीत व्यक्तिचित्र रांगोळी (पोट्रेट)या प्रकारातही त्यांनी महात्मा गांधी, सरदार पटेल अशा महापुरुषांच्या रांगोळ्या रेखाटल्या आहेत.

 

जळगाव येथे झालेल्या ‘शिक्षणाची वारी’ या विभागीय कार्यक्रमात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात त्यांनी काढलेल्या रांगोळ्या खूप लोकप्रिय ठरल्या. या कार्यक्रमाला हाजारो शिक्षक व विद्यार्थ्यानी भेट दिली होती. त्यात त्यांच्या रांगोळ्यांचे खूप कौतुक झाले, “बहिणाबाईंची हुबेहूब पोट्रेट रांगोळी” आकर्षणाचा विषय ठरली व या कलेसोबतच त्या विद्यार्थ्यांसाठी “सुंदर हस्ताक्षर छंदवर्ग” च्या माध्यमातून हजारो विद्यार्थी घडवले आहेत. सध्या देवनागरी मराठी सुलेखन, इंग्रजी सुलेखन (कॅलिग्राफी), “वारली आर्ट” अशा विविध कलांचे क्लास कोरोना मुळे प्रत्यक्ष घेता येत नाहीत म्हणून मोबाईच्या माध्यमातून आॅनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना कला शिकवत आहेत. त्यामुळे त्या मुंबई, पुणे, नाशिक, जालना, जळगाव जिल्ह्यातील, तालुक्यातील विविध विद्यार्थ्यांशी जोडल्या गेल्या आहेत व विद्यार्थ्यांमध्ये कलाप्रिय व आवडत्या शिक्षिका ठरल्या आहेत. खूप वर्षांपूर्वी त्यांनी “पाचोरा लेडी आयडल” ही स्पर्धा प्रथम क्रमांकाने जिंकली होती. या मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे