कृषीवार्ताब्रेकिंग

लाखो रुपयांचे अनुदान लाटणाऱ्या जिल्ह्यातील१५४ शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यांवर चढणार बोजा..

छत्रपती संभाजीनगर | नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेतील (पोकरा) मधुमक्षिका पालन आणि शेडनेट बांधल्याचे कागदोपत्री दाखवून लाखो रुपयांचे अनुदान लाटणाऱ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १५४ शेतकऱ्यांकडून अनुदान रकमेची वसुली करण्यासाठी त्यांच्या सातबारांवर अपहार केलेल्या रकमेचा बोजा चढविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. कृषी विभागाकडून पोकरा घोटाळ्यातील शेतकऱ्यांची यादी महसूल विभागाला पाठवली जाणार आहे.

२०१८ ते २०२४ कालावधीत पोकरा योजनेचा पहिला टप्पा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध गावांत राबविण्यात आला. पोकरातील विविध योजनांचा लाभ घेताना पैठण आणि कन्नड, सिल्लोड तालुक्यांत अपहार झाला होता. पैठण तालुक्यातील पोकरा घोटाळ्यावर गतवर्षीच्या वृत्त मालिकेची दखल घेत कृषी विभागाने चौकशी समिती नियुक्त केली होती.

  • अधिकारी, कर्मचाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न?

छत्रपती संभाजीनगर आणि पैठण उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत पोकरामध्ये गैरव्यवहार झाला. या घोटाळ्यातील संबंधित शेतकऱ्यांकडून वसुली सुरू करण्याचा निर्णय झाला. असे असले, तरी या घोटाळ्यातील संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न कृषी विभागाकडून सुरू असल्याचे दिसून येते. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या संगनमताने हा अपहार झाल्याची चर्चा आहे, असे असताना त्यांच्यावर कोणतीही कारवाई आतापर्यंत झाली नाही.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे