आपल खान्देशमहाराष्ट्र

पाचोरा तालुक्यातील आखतवाडेगाव अंधारात, वीज महावितरण अधिकाऱ्यांची मनमानी !

गावात गेल्या तीन दिवसांपासून वीज खंडीत झाल्यामुळे नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे...


पाचोरा तालुक्यातील आखतवाडे येथील अर्ध्या गावातील ग्रामंस्थ गेल्या तीन दिवसांपासून विजेच्या समस्येने हैराण झाले आहेत. आखतवाडे येथे गेल्या पंधरा वर्षांपासून दोन सिंगल फेजच्या आहेत, मात्र यातील एका रोहित्रावर जास्त लोड येतो त्यामुळे ट्रान्सफारमर नेहमीच जळत आहे अशी संतप्त गावाकऱ्याची नवीन ट्रान्सफार्मरची मागणी.

गावात वीजपुरवठा करण्यासाठी बसविलेला ट्रान्सफॉर्मर तीन दिवसांपूर्वी जळाला आहे. ट्रान्सफॉर्मर जळाल्यामुळे गावात रात्रीच्यावेळी अंधाराचे साम्राज्य पसरते.  महावितरण ग्रामस्थांच्या तक्रारींकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. आखतवाडे येथील ग्रामस्थांची विजेची समस्या कायमची सुटण्यासाठी तिसऱ्या सिंगल फेज डी.पी.ची तात्काळ ऊभारणी करण्याची मागणी होत आहे.

या गावात वीज पुरवठा करण्यासाठी येथे दोन ट्रांसफार्मर (डेपी) आहे. आता कुटुंबसंख्या दुपटीने वाढल्याने येते आणखी एक ट्रांसफार्मरची गरज आहे. परंतु याकडे वीज वितरण कंपनीने दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे अतिरिक्त भार पडून येथील ट्रांसफार्मर वारंवार नादुरुस्त होत आहे. यातच कंपनीच्या दुर्लक्षाने केबल, किटकॅट आधीची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. यातून गेल्या तीन दिवसा पासून ट्रांसफार्मर नादुरुस्त झाला आहे. हा ट्रांसफार्मर दुरुस्त झाला नाही. दुरुस्ती बाबत नागरिकांनी वारंवार पाठपुरावा केला जात आहे, मात्र येथील वीज वितरण कार्यालयाकडून विविध कारणे सांगत दुरुस्तीकडे साफ दुर्लक्ष करीत आहे. 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे