पाचोरा तालुक्यातील शहापूराच्या जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांच्या जिवीतास धोका, जिल्हा परिषद शाळेची दुरवस्था..
राज्यातील जिल्हा परिषद शाळेत पहिल्याच दिवशी शाळेत गुलाबाची फुले देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. त्यामुळे एकीकडे शाळेत मुलांची संख्या वाढावी यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत; मात्र दुसरीकडे पाचोरा तालुक्यातील लोहारा जवळच्या शहापूरा गावाच्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या छताला लागलेल्या गळतीत मुलांना शिक्षण घ्यावे लागत असल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने शाळा दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
पाचोरा तालुक्यातील लोहारा जवळच्या शहापूरा गावाच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची अत्यंत दुरावस्था झाली असून शाळेच्या वर्गखोल्यांच्या छताच्या सिमेंटचा स्तर गळून पडल्याने पावसात पाणी गळत असून छताचा लोखंडी गज दिसू लागले आहेत. त्यामुळे ज्ञानार्जन करताना विद्यार्थ्यांच्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे.
शहापूरा येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीची मागील अनेक वर्षापासुन दुरावस्था झाली असून पावसाळ्यात छताचे धपले पडत आहेत. त्यामुळे वर्ग खोल्यात पाणी साचत आहे. तसेच शिक्षण घेण्यास व शिक्षण देण्यास मुलांसह शिक्षकांना अडचणीस सामोरे जावे लागत असून या जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते चोथा पर्यत वर्ग आहते तर पाच शिक्षक कर्मचारी कार्यरत आहेत. शाळेच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तसेच शाळा समिती अध्यक्षांनी शाळेची पाहणी करुन त्वरीत शाळा दुरुस्ती करावी अशी मागणी पालक व सर्वसामान्य नागरिकांनी केली आहॆ. जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पाठविण्याची मानसिकता आर्थिकदृष्ट्या सक्षम पालकात नसते. त्यामुळे सर्वसामान्य व गरिब कुटुंबातील पालकांना आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत पाठविण्याशिवाय पर्याय नसतो.
जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक चांगल्या प्रकारे ज्ञानार्जनाचे कार्य करीत आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत पाठावा म्हणून घरी तसेच वाड्या वस्तीवर जातात व शिक्षणाचे महत्त्व पालकांना पटवून सांगतात. त्यामुळे या शाळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागाने सुसज्ज अशी इमारत तसेच वेळोवेळी शाळाची दुरुस्ती करणे ही गरज आहे


