आपल खान्देश

मोठी बातमी! ‘या’ जिल्ह्यात किराणा दुकानं आणि भाजीपालाही बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

परभणी – राज्यात वाढत्या करोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाकडून ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत 15 दिवसांच्या लाॅकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या नियमावलीनुसार किराणा दुकाने, भाजी, बेकरी यांना अत्यावश्यक सेवेत ठेवण्यात आले आहे. मात्र, परभणीतील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता पाच दिवस किराणा, भाजी, आणि बेकरीची दुकानेही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. त्यानुसार, 17 एप्रिल ते 22 एप्रिलपर्यंत किराणा दुकाने, भाजी, बेकरीची दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.

दरम्यान, परभणीत करोनाचा प्रादुर्भाव अधिक वेगाने वाढत आहे. नवीन करोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. काल बुधवारी एका दिवसात तब्बल 1172 नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 20 जणांचा मृत्यू झाला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे