एस म्हात्रे
मुंबई : शहरातील कांदिवली भागातील हंसा हेरिटेज बिल्डिंगला आग लागली असून सात अग्मिशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. युद्ध पातळीवर ही आग विझवण्याचं काम सुरु आहे. दरम्यान, परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. या दुर्घटनेत कोणालाही इजा झालेली नाही.
या आगीमध्ये दोन जण जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे, अशी माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा