राष्ट्रीय किसान मोर्चा व राष्ट्रीय ओबीसी मोर्चा ची शेतकरी व ओबीसी बांधवांच्या कोपरा सभेने शेतकरी व ओबीसी झाले जागृत
उमाळे ता.जि.जळगाव येथे जिल्हा राष्ट्रीय किसान मोर्चा व राष्ट्रीय ओबीसी मोर्चा ची शेतकरी व ओबीसी बांधवांच्या कोपरा सभेने शेतकरी व ओबीसी झाले जागृत
निलेश पाटील
भारतातील शेतकरी व ओबीसी यांच्या समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालल्या आहेत.या समस्या सोडविण्यासाठी व जनतेत जागृती निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय किसान मोर्चा व राष्ट्रीय ओबीसी मोर्चाने संयुक्तपणे भारतातील ३६ राज्यात,६५० जिल्ह्यात व ४५०० तालुक्या त ५ टप्प्यातील आंदोलन घोषित केले आहे.

२९ ऑक्टोबर २०२१ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे जिल्हास्तरीय धरणे आंदोलनाचा २ रा टप्पा असल्याने संपुर्ण जळगाव जिल्ह्यात कोपरा सभांद्वारे जनजागृती केली जाते आहे.
आज उमाळे येथे मा.सुनिलदादा शिंदे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोपरा सभा झाली.मा.विलासराव पाटील(महाराष्ट्र राज्य सदस्य राष्ट्रीय ओबीसी मोर्चा),मा.प्रा.गणपतराव धुमाळ (प्रसिध्द शेती अर्थतज्ञ) व मा.किशोरभाऊ नरवाडे यांनी शेतक-यांच्या ३काळे कायद्यांविषयी व ओबीसींवर गुलाम भारत ते आजपर्यंत ब्राम्हणी व्यवस्थेने केलेल्या अन्यायाची पुराव्यानिशी मांडणी केली.
सुत्रसंचलन मा.सुरेशभाऊ धनगर यांनी केले. ही सभा यशस्वी होण्यासाठी मा.प्रविणभाऊ बि-हाडे व त्यांचा शेतकरी व ओबीसी मित्रपरिवार यांनी परिश्रम घेतले.
Advertising
आपली जाहिरात ZOOM करा जाहिरात साठी- 9987102625





