देश-विदेश

पुरुष पोलीस धरायला गेल्यावर बाबा म्हणाला ‘ मी महिला आहे ‘ ‘, कारनामे ऐकून पोलिसही चक्रावले

देशात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असताना अशीच एक घटना मध्य प्रदेशात उघडकीस आली आहे. ज्याला लोक बाबा समजून पूजत होते तोच चक्क महिला आणि ती देखील घरातून पळून गेलेली आढळून आल्याने पोलिसही हादरले. इंदोरमध्ये नकली पोलीस अधिकारी बनून फिरणारा एक तरूण रवि सोलंकी याला अटक करण्यात आली होती. रवीने पोलीस अधिकारी असल्याचे सांगत चांगल्या घरातील एका तरूणीसोबत साखरपूडा केला होता मात्र दरम्यान त्याला अटक झाली अन एक एक धागे उलगडत गेले.

पोलिसांच्या चौकशीतून समोर आलं की , आरोपी तरूणासोबत जो तांत्रिक छोटू महाराज धरला गेला होता तो पोलिसांच्या ताब्यात असून हा महाराज मुळात पुरूष नसून एक महिला आहे. तांत्रिक छोटू महाराज याचे खरे नाव सीमा असून त्याला सीमानंद महाराज असेही म्हटतात. सीमा ही विवाहित असून पतीसोबत वाद झाल्यावर इंदुरला पळून आली होती.

नकली पोलीस अधिकारी बनून फिरणारा तरूण रवि सोलंकी आणि हा अथवा ही छोटू महाराज आपल्या जाळ्यात अडकवत लोकांना गंडा घालत होते. पुरुष पोलीस धरायला गेला तेव्हा या बाबाने आपण महिला असल्याचा धक्कादायक खुलासा केला. छोटू महाराज मुळात एक महिला असून पुरुष बनवून ती समाजाची फसवणूक करत होती व या कृत्यात तिला रवी सोळंकी देखील साथ देत होता.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे