आपल खान्देश

एस टी भाडेवाढ रद्द करा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे उग्र आंदोलन करण्यात येईल पाचोरा आगारास दिले निवेदन

जोपर्यंत भाडे वाढ रद्द होत नाही तोपर्यंत एकही बस आगाराच्या बाहेर निघू देणार नाही अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष अनिल वाघ यांनी निवेदनाद्वारे केली

पाचोरा (झूम-मराठी) ऐन दिवाळीत एसटीच्या तिकीट दरात 17 टक्क्यांची भाडेवाढ, राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत भाडेवाढीचा निर्णयाने, आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज्य परिवहन पाचोरा आगारला भाडे वाढ रद्द करावी या संदर्भात निवेदन देण्यात आले त्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रमुख मागण्या होत्या राज्य परिवहन एसटी महामंडळने भाडे वाढ केली असून ती सामान्य जनतेला परवडण्यायोग्य नाही.

राजकारणाच्या दसरा मेळाव्याला बसेस मुंबईला पाठवल्या तेव्हा का नाही भाडेवाढ झाली विद्यार्थ्यांनी शाळा कॉलेजच्या ॲडव्हान्स पैसे देऊन पासेस काढून सुद्धा त्यांना बस उपलब्ध होत नव्हती त्यामुळे विद्यार्थ्यांचे खूप हाल झाले हे कमी की काय?त्यात दिवाळीच्या वेळेस भाडेवाढ होणे म्हणजे गोरगरीब जनतेवर अन्याय आहे दोन दिवसात भाडेवाढ रद्द न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे उग्र आंदोलन करण्यात येईल व जोपर्यंत भाडे वाढ रद्द होत नाही तोपर्यंत एकही बस आगाराच्या बाहेर निघू देणार नाही अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष अनिल वाघ यांनी निवेदनाद्वारे केली,  मनसेचे जळगाव जिल्हाध्यक्ष अनिल भाऊ वाघ, सुरेंद्र सिंग पाटील, पाचोरा तालुका अध्यक्ष शुभम पाटील, भडगाव तालुका अध्यक्ष सागर पाटील, पाचोरा शहराध्यक्ष ऋषिकेश भोई, भडगाव शहराध्यक्ष सुनील पाटील, सरचिटणीस श्रीकृष्ण दूंदुले, जितेंद्र नाईक, कृष्णा जगताप, वाल्मीक जगताप, आदीमनसे सैनिक व सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे