पाचोरा तालुक्यातील प्रत्येक गावांत शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी ग्राम रक्षक दलांची निवड
झूम मराठी वृत्तसेवा
पाचोरा तालुक्यातील ग्रामरक्षक दलाची बैठकित जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली पाचोरा तालुक्यातील प्रत्येक गावांत शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी ग्रामरक्षक दलाची निवड करण्यात आली.
गावांत शांतता व सुव्यवस्था राखण्यास मदत म्हणून ग्रामरक्षक दलाची जबाबबदारी असते गावातील लोकसहभागातून आळा घालण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ग्रामरक्षक दलाची स्थापना केली आहे.
पाचोरा येथे जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांच्या पाचोरा पोलीस स्टेशन येथे वार्षिक अहवाल तपासून निमित्ताने आयोजित ग्राम रक्षा दलाच्या सदस्यांना लाठी टी-शर्ट आणि सिटी वाटप करण्यात आली असून कायदा सुव्यवस्था याबाबत पोलिस अधीक्षकांनी मार्गदर्शन केले आहे. ग्राम रक्षक दलाच्या सदस्यांनी अधिकाधिक पोलिसांना मदत करून सहकार्य करावे, व कुठलीही संकल्पना जर यशस्वी करायची असेल तर काम करण्याची जिद्द मनापासून ठेवावी लागते आपण ग्रामरक्षक दलाचे सदस्य झाले याबाबत आपले अभिनंदन आपल्याकडून पोलिसांना मदत करण्याचे हेतूने कार्य होईल अशी अपेक्षा बाळगतो. त्याचबरोबर पाचोरा तालुक्यातील पुनगाव आणि खडकदेवळा या दोन्ही गावातील ग्रामरक्षक दलाच्या सदस्यांनी अतिशय उत्तम काम करत पोलिसांना सहकार्य करून एक आदर्श निर्माण केला आहे. त्याबाबत देखील पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांनी सदर ग्राम रक्षक दलाच्या सदस्यांचा सन्मान केला व कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर ठेवली आहे. महाराष्ट्र पोलीस दलाच्या मदतीला ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य व सामान्य नागरिक हे नेहमी पोलिसांचे कान नाक डोळे हात म्हणून काम करतात त्यांच्या माध्यमातून गावातील ग्रामरक्षक दलाच्या माध्यमातून गावात होणाऱ्या छोट्या मोठ्या चोऱ्या देखील थांबतील व यावर अंकुश बसेल असे मत व्यक्त केले.
_____________________________________

______________________________________
जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे, चाळीसगाव विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश जी चोपडे, पाचोरा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी भारतजी काकडे त्याचबरोबर पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन- पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल मोरे, पोलीस उपनिरीक्षक गणेश चौबे तसेच पाचोरा पोलीस स्टेशनचे पाचोरा तालुक्यातील पोलीस पाटील व ग्राम रक्षक दलाचे सदस्य या ठिकाणी उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सीएन चौधरी सर व प्राध्यापक शिवाजी शिंदे सर यांनी केले





