जळगाव : पावसाचा अनियमितेमुळे शेतातून उत्पन्न येत नाही. यातच यंदा अतिवृष्टीमुळे उत्पन्न मिळणार नसल्याचे चित्र दिसत असून, डोक्यावर कर्जाचा बोजा आहे. या तणावातून पथराड (ता.धरणगाव) येथील शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली.
पथराड (ता. धरणगाव) येथील किशोर सुरेश जाधव (वय ४४) हे सोमवारी रात्री घरातील कडी लाऊन झोपले. आज सकाळी पत्नी व कुटुंबीयांनी किशोर यांना आवाज दिल्यावर दरवाजा उघडत नाही शिवाय आतून प्रतिसाद मिळत नसल्याने काही लोकांच्या मदतीने दरवाजा तोडला. यावेळी किशोर जाधव हे विषारी किटकनाशक औषध पिऊन पडलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांना दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पिक झाले खराब
किशोर जाधव यांच्याकडे तीन बीघे शेती आहे. यावर्षी पाऊस जास्त झाल्यामुळे सर्व पिक खराब झाल्याने कर्ज आहे. यामुळे त्याने आत्महत्येचे पाऊल उचलले असे ग्रामस्थांमध्ये चर्चा होती. याबाबत पोलीसात अकस्मात मृत्यूची नोद करण्यात आली आहे. किशोरच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी व आई असा परिवार आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा