भुसावळ येथे राष्ट्रीय गुरू रविदास क्रांती मोर्चाची जिल्हास्तरीय सभा संपन्न
भुसावळ :- राष्ट्रीय गुरू रविदास क्रांती मोर्चा चे राष्ट्रीय संरक्षक मा वामन मेश्राम यांच्या आदेशानुसार संघटनेची भुसावळ येथे शासकीय आश्रम गृहात सभा घेण्यात आली.या सभेचे अध्यक्ष राज्य कार्यकारणीतील कार्यध्यक्ष मा विजयराज सेगेकर हे होते.
जिल्हास्तरीय सभेत पाचोरा तालुक्यात अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक अत्याचाराचा निषेध करून गुन्हेगाराना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी.तसेच बिलवाडी गावातील मुलीवर झालेल्या अत्याचारावर देखील चर्चा करण्यात आली त्या प्रकरणातील गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी या दोन प्रकरणावर संघटनेच्या माध्यमातून चर्चा झाली.या प्रकरणाचा राज्यभर निषेध करण्यात येत आहे पीडित कुटूंबाला न्याय न मिळाल्यास हे प्रकरण राष्ट्रीय व्यापी केले जाईल असे ठरविण्यात आले.

चर्मकार समाजावर होत असलेला अन्याय अत्याचार थांबवावे यासाठी समाजातील लोकांनी दुरावा बाजूला सारून एक जुटीने एकत्र यावे समाजाची प्रगती व्हावी या दुष्टीकिनातून काम केले जावे. चर्मकार समाजात असलेल्या साडे बारा जातीतील लोकांनी एकत्र यावे भाषावाद, प्रांतवाद, बाजूला सारावे एकमेकांच्या सुखा, दुःखात सहभागी व्हावे.असे ठरवण्यात आले.
सभेचे अध्यक्ष मा विजयराज सेगेकर तर सभेचे प्रस्ताविक मा.नंदलाल आगारे यांनी तर सूत्रसंचालन मा.मुकेश सावकारे यांनी केले तसेच मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष मा.जी.पी.काकडे यांनी आपले मार्गदर्शन करताना खाजगीकरणं रोखण्यासाठी समाजच्या लोकांनी एकत्र यावे खाजगीकरण थांबावे म्हणून प्रचार प्रसार करावा भारतीय संविधानाचे रक्षण करण्यासाठी बुद्धीजीवी लोकांनी वेळ, बुद्धी, पैसे खर्च करून काम करावे. बहुभाषिक चर्मकार समाजाने एकत्र यावे असे मत मांडले.
सभेच्या अध्यक्षांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मा.कांशीराम साहेब यांच्या कार्याला उजाडा दिला.ते महाराष्ट्र् दौऱ्यावर होते.ते म्हणाले की, फुले,शाहू,आंबेडकर विचार धारेच्या लोकांनी राजकारणात यावे त्याशिवाय बहुजन समाजातील लोकांना न्याय मिळणे कठीण आहे.तसेच भारतीय सविधानाचे रक्षण केल्यास येणारी पिढी गुलामीतुन मुक्त होईल तसेच चर्मकार समाजाची भारतात मोठी संख्या असून सुद्धा त्याच समाजावर अन्याय अत्याचार जास्त होत आहे,ही आपल्या समाजासमोर मोठे आव्हान आहे,त्याकारिता देश पातळीवर मोठ्या प्रमाणात ह्या राष्ट्रीय-व्यापी संघटनेचा वाढ विस्तार केल्याशिवाय अन्याय अत्याचार रोखता येणार नाही असे अध्यक्षीय मार्गदर्शनात त्यांनी सांगितले
सभेत जिल्हा कार्यकारणी गठीत करण्यात आली जिल्हा अध्यक्ष म्हणून पाचोरा येथील मा नंदलाल आगारे यांची एकमताने निवड घोषित केली तसेच जिल्हा उपाध्यक्ष उत्तम डी सोनवणे,कार्याध्यक्ष मा शशिकांत सावकारे,सहसचिव मा मुकेश वानखडे तर मीडिया प्रभारी म्हणून मा मुकेश सावकारे जिल्हा कार्यकारणी सदस्य म्हणून मा अविनाश वानखेडे सर मा भास्कर शेवाळे ,मा मनोहर जोनवाल जळगाव शहर प्रमुख मा शरद बेरभैया यांची नियुक्ती करण्यात आली तसेच राज्य कार्यकारणी सदस्य म्हणून मा जी पी काकडे यांची नियुक्ती करण्यात आली व विभागीय सदस्य म्हणून मा राजेंद्र बाविस्कर यांची नियुक्ती करण्यात आली. सभेला जिल्ह्यातून अनेक कार्यकर्ते उपस्थित होते मा राहुल जयकर,मा मुकेश सावकारे मा जितेंद्र डोळसे,मा राजेश वाढेकर, मा अनिल डोळसे,मा विलास सपकाळे, मा राजू चिमणकर,मा आनंद जाधव, मा प्रकाश इंगळे, मा कुंदन तायडे, मा विलास चिकने, मा आर बी परदेशी ,मा नितीन गाढे,मा लिलाधार वानखेडे,मा लिलाधर सोनवणे,मा कमलाकर सावकारे,मा प्रमोद काकडे ,मा राजू सोनवणे यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.शेवटी मा राजेंद्र बाविस्कर यांनी सर्वांचे आभार मानले अशाप्रकारे सभा यशस्वी संपंन्न झाली.



