आपल खान्देश

भडगावत बाळगोपालांची सायकल रॅलीने दिला पर्यावरण संवर्धन संदेश

बाळगोपालांची सायकल रॅलीने दिला पर्यावरण संवर्धन संदेश

भडगांव  ओंकार विहार कॉलोनी येथे अंतरराष्ट्रीय सायकल दिनाच्या निमित्ताने सायकल रॅलीचे चिमुकले मित्रांनी आयोजन करून रंगत आणली यावेळी चि. कृष्णा, रेयांश,भावेश, पार्थ,ओम श्रावणी यांनी ५ प्रदक्षिणा पूर्ण केल्या. यावेळी प्रा. संदिप पाटील यांनी सायकलींचे जीवनातील महत्त्व व आरोग्यासाठी सायकल प्रवास केल्याने उंची वाढते निसर्ग संवर्धन,शरीराचा सर्वांगीण व्यायाम होत असतो असे मार्गदर्शन केले यावेळी प्रा. सुरेश कोळी, विवेक शिरसाठ, राजेश पाटील यांनी कौतुक केले.

पर्यावरण म्हणजे सर्व सजीवांच्या जीवनावर परिणाम करणारी भोवतालची परिस्थिती. निसर्ग ही ईश्‍वराने निर्माण केलेली अद्भूत गोष्ट आहे. या निसर्गामध्ये निसर्गत:च अस्तित्वात असलेल्या घटकांचा वापर आपण व इतर सजीव आपल्या पालन पोषणाकरिता वापर करीत असतात. पृथ्वीवर असणार्‍या सर्व घटकांचा मानवी जीवनावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या परिणाम होतो.

पर्यावरणामध्ये उपलब्ध असलेल्या घटकांचा वापर मानवाने आपल्याबरोबरच इतर सजीव घटकांचा विचार करुन केल्यास पर्यावरणाचा समतोल बिघडणार नाही व भविष्यात येणार्‍या पर्यावरणीय समस्यांना सामोरे जावे लागणार नाही परंतू सद्दस्थिती लक्षात घेता पर्यावरणीय समस्या दिसवे-दिवस वाढत असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर हानी होताना दिसत आहे. पर्यावरणातील प्रत्येक सजीव घटकाचे संवर्धन करणे ही आपली एक सामाजिक जबाबदारी आहे हे विसरुन चालणार नाही. जनजागृती म्हणून आपण प्रत्येकाने सहभागी होऊन अथवा पर्यावरण सामाजिक संस्थामध्ये सहभागी होऊन आपले कर्तव्य पार पाडल्यास पर्यावरणाचे संरक्षण होण्यास मदत होईल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे