ब्रेकिंग

ओबीसी ची जातीनिहाय जनगणना का? करित नाही!जातीनिहाय जनगणना करण्यासाठी 31 जानेवारी ला भारत बंद

ओबीसी ची जातीनिहाय जनगणना का? करित नाही!जातीनिहाय जनगणना करण्यासाठी 31 जानेवारी ला भारत बंद

 ऊठ ओबिसी जागा हो-या देशाचा राजा हो!!गावोगावी ओबीसी बधुंना जागृत करण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी परिषद मैदानात

10 मुद्यांना घेऊन 31जाने.2022ला राष्ट्रीय ओबीसी मोर्चा द्वारे भारत बंद!!

प्रचारादरम्यान जामनेर तालुक्यातील वडगांव टिघ्रे या गावी दि.19/1/2022लामा.राहुल गायकवाड साहेब (भारत मुक्ती मोर्चा जामनेर तालुका उपाध्यक्ष)यांचे व सर्व गावकर्यांच्या समन्वयातुन सहकार्यातुन बामसेफचे पुर्णकालीक प्रचारक मा.नितिन गाढे सर यांचे अध्यक्षतेखाली व भारत मुक्ती मोर्चा चे जामनेर कार्यकर्ते मा.विश्वास साबळे सर यांचे उपस्थितीत हनुमान मंदिर पारावर ही बैठक संपन्न !बैठकित बहुजन समाजातील सर्व जास्तीत जास्त ओबिसी लोकं मोठ्या संख्येने उपस्थित होते,दोन तास सलग बैठक चालली, भारत बंद आपण का करतोय…? कशासाठी करतोय..? भारत बंद नंतर काय होईल…? यासंदर्भात माहिती देण्यात आली,आपला उद्देश काय आहे तो सांगितला, टिघ्रे गावालाच जामनेर तालुक्यातुन एक आंदोलन सेंटर बनविण्यात आले,सेंटर प्रभारी म्ह्णुन राहुलभाऊ गायकवाड यांची निवड झाली,येत्या 30तारखेपर्यंत आजुबाजुच्या परिसरात जोरदार प्रचार करण्याची घोषणा झाली,बैठकिचे सुत्रसंचलन मा.राहुल गायकवाड सर यांनी केले,अध्यक्षता मा.नितीन गाढे सरांनी केली व आभार प्रदर्शन मा.विश्वास साबळे सर यांनी केले व भारत बंद च्या यशस्वीतेसाठी 320/-रु.जनांदोलन निधी उपस्थितांनी दिला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे