ठाण्यात अतिवृष्टीचा इशारा, जिल्ह्यातील सर्व शाळांना दोन दिवस सुट्टी
ठाण्यात अतिवृष्टीचा इशारा, जिल्ह्यातील सर्व शाळांना दोन दिवस सुट्टी जाहीर
राज्यात गेल्या काही दिवसात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. पुणे आणि ठाणे जिल्ह्यात येत्या दोन दिवसात अति मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे त्याचबरोबर ठाण्यातील शाळांना देखील गुरुवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
अतिवृष्टीची परिस्थिती लक्षात घेवून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून जिल्ह्यातील इयत्ता १२वी पर्यंतच्या शाळांना दि. १४ आणि १५ जुलै रोजी अशी दोन दिवसांची सुटी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राजेश नार्वेकर यांनी जाहीर केली आहे.
#ठाणे जिल्ह्यातील इ.१२ वी पर्यंत च्या शाळा दि. १४ व १५ जुलै रोजी बंद ठेवण्याबाबतचा जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचा आदेश #शाळा#आपत्ती#rain #Orengalrt pic.twitter.com/qoalSUr8tx
— DISTRICT INFORMATION OFFICE, THANE (@Info_Thane1) July 13, 2022



