आपल खान्देशमहाराष्ट्र

महाराष्ट्र सरकारचे सचिन सोमवंशी यांनी आभार मानले!

संभाजीराजेंनी केलेल्या मागण्यांपेक्षा अधिक मुद्दे समाविष्ट करत मागण्या मान्य केल्याचंही सोमवंशी यांनी नमूद केलं. हा ऐतिहासिक निर्णय असल्याचंही त्यानी म्हटलं आहॆ


झूम मराठी

पाचोरा (प्रतिनिधी) – सकल मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी विविध मागण्यांसाठी खा. छत्रपती संभाजी महाराज यांनी सूरु केलेल्या उपोषणाची गंभीर दखल घेत महाविकास आघाडी सरकारने राज्य सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या मागण्या मान्य करून ना. दिलीप वळसेपाटील, ना. एकनाथ शिंदे आदीं उपोषण स्थळी जाऊन छत्रपती संभाजी महाराज यांना पत्र देवुन छत्रपती संभाजी महाराज यांचे उपोषण सोडले. महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या भुमिकेचे मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक सचिन सोमवंशी यांनी आभार मानले असुन सदरच्या मागण्यांचा पाठपुरावा तात्काळ करण्यात याव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या उपोषणाला यश मिळालं आहे. त्यांच्या उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी राज्य सरकारने मराठा समाजाबाबत त्यांनी गेलेल्या सर्व मागण्या मान्य केल्या. स्वतः कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजीराजेंच्या समोर याची माहिती देत मान्य केलेल्या १५ मागण्यांची घोषणा केली. तसेच संभाजीराजेंनी केलेल्या मागण्यांपेक्षा अधिक मुद्दे समाविष्ट करत मागण्या मान्य केल्याचंही एकनाथ शिंदे यांनी नमूद केलं. हा ऐतिहासिक निर्णय असल्याचंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं. ते मुंबई आझाद मैदानावर उपोषणस्थळी बोलत होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे