आपल खान्देश

शिक्षिकेला विद्यार्थीनिंनी वाजत गाजत सेवानिवृत्ती चा निरोप दिल्याने शिक्षिकेला अश्रुंचा बांद फुटला

पाचोरा (प्रतिनिधी) – शहरातील माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षिकेला विद्यार्थीनिंनी वाजत गाजत सेवानिवृत्ती चा निरोप दिल्याने शिक्षिकेला अश्रुंचा बांद फुटला

शाळेतील सेवानिवृत्ती चा निरोप समारंभ शहरातील दोन ठिकाणी करण्यात आला यात आगळ्यावेगळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांनिंसह शाळेतील कर्मचारी वर्गाने शहरातील माध्यमिक वउच्च माध्यमिक विद्यालयात केला. शाळेतील विद्यार्थींनी प्रिय शिक्षिका श्रीमती मायाताई सुर्यवंशी यांचा कर्तव्यपुरर्ती निरोप समारंभ आयोजित करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापिका श्रीमती सुरेखा सोनवणे, प्राचार्य संजय पवार, अॅड योगेश पाटील, पत्रकार संदीप महाजन, मुख्याध्यापिका भारती बागड, प्रा. रविंद्र चव्हाण, ओरीएंट सिमेंट कोल्हापूर चे विभागिय व्यवस्थापक सुयोग साळोखे, डॉ. अनिल देशमुख, राहुल देशमुख, प्रमोद गरुड, जे. व्ही. शिंदे, नंदु सोमवंशी, सौ. सुप्रिया सोमवंशी, सौ. अर्चना साळोखे आदी उपस्थित होते

या वेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला ” इतनी शक्ति दे दाता हे गित ” प्रा. प्रतिभा राठोड यांनी सादर केले. यावेळी संस्थेच्या सर्व कर्मचारी वर्गाने सत्कारमूर्ती श्रीमती मायाताई सुर्यवंशी यांचा सत्कार केला. विद्यार्थ्यांनींनी आपल्या लाडक्या शिक्षाकेला आपल्या हस्त कलेच्या वस्तू दिल्या. प्रमुख पाहुण्यांनी समयोचित भाषणे केली. शाळेतुन निघतांना ढोल ताशा लावुन बिदाई करण्यात आली यावेळी श्रीमती सुर्यवंशी यांना अश्रू अनावर झाले. आगळ्यावेगळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांनिंसह शाळेतील कर्मचारी वर्ग शहरातील मान्यवरांनी त्यांना निरोप दिला यावेळी. विद्यार्थींनी गाडीची सजावट फुलांनी केली होती. काही अंतरापर्यंत विद्यार्थ्यांनींनी सेवानिवृत्त शिक्षिकेच्या मागे चालत गेल्या. लाडक्या शिक्षिका आता शाळेत शिकवायला येणार नाही याचे दुःख विद्यार्थींना होते. या कर्तव्यपुरर्ती सोहळ्याची चर्चा परीसरात सुरु आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचल श्रीमती उज्वला देशमुख, मौलाना अमजद यांनी केले

कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने अथकपरीश्रम घेतले

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे