आपल खान्देशगुन्हेगारी

पाचोरा शहरातील तरुणाची मुलाखत देण्याच्या नावाखाली 17 हजारात फसवणूक!

पाचोरा लाईव्ह – सिटी रिपोर्टर

पाचोरा : पाचोऱ्यातील तरुणाची ऑनलाईन मुलाखत देण्याच्या नावाखाली 17 हजार 600 रुपयात फसवणूक करण्यात आली. याबाबत पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकारात वाढ सोहन अशोक मोरे (24, शिवाजी नगर, पाचोरा) हा तरुण कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. सोमवार, 2 मे रोजी दुपारी त्याला अनोळखी नंबरवरून फोन आला. नोकरीसाठी ऑनलाईन मुलाखत द्या, असे समोरील व्यक्तीने सांगितले. समोरील नंबरवरून महिलेने एक लिंक पाठविली व पेपर सोडविण्यास सांगितले. तरूण पेपर सोडवित असतांना त्याच्या बँक खात्यातून 17 हजार 600 रुपये परस्पर वर्ग करून फसवणूक करण्यात आली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पाचोरा पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार निवृत्ती मोरे करीत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे