आपल खान्देशगुन्हेगारी

15 हजारांची लाच घेताना, अमळनेरातील पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात!!

 झूम मराठी अंमळनेर – एका गुन्ह्याच्या प्रकरणात पोलीस तपासात मदत करण्यासाठी 15 हजारांची लाच मागणी करून लाच स्वीकारणार्‍या अमळनेर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक जळगाव एसीबीच्या जाळ्यात अडकला. भास्कर चव्हाण असे लाच स्वीकारणार्‍या पोलीस नाईकचे नाव आहे.

भास्कर चव्हाण यास जळगाव एसीबीच्या पथकाने राहत्या घरी अटक केली. ही कारवाई शनिवार, 23 रोजी सायंकाळच्या सुमारास करण्यात आल्याने पोलीस वर्तुळातमोठी खळबळ उडाली. जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव व सहकार्‍यांनी हा सापळा यशस्वी केला.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे