आपल खान्देश

उत्कृष्ट कामगिरी बद्दल पाचोरा तहसीलदार कैलास चावडे सन्मानीत, जिल्ह्यात ४७ उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान..

झूम मराठी वृत्त

जळगाव महसूल दिनानिमित्त जळगाव जिल्ह्यातील महसूल विभागातील ४७ अधिकारी व कर्मचाऱ्याना उत्कृष्ट अधिकारी व कर्मचारी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी बद्दल पाचोरा तहसीलदार कैलास चावडे यांना सन्मानीत करण्यात आले. हा कार्यक्रम सोमवारी दुपारी ४ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील नियोजन भवनात मोठ्या थाटात पार पडला.

यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांच्यासह कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते. उद्घाटनानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर उत्कृष्ट अधिकारी आणि कर्मचा-यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

तहसीलदार कैलास चावडे यांना शुभेच्छा देतांना दिलीप पाटील -ट्रेन लाईव्ह व दिलीप परदेशी -झूम मराठी.

_________________________________________

जिल्ह्यात यांचा झाला सन्मान,

उपविभागीय अधिकारी विनय गोसावी (एरंडोल), उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, किरण सावंत पाटील (जळगाव), जिल्हा गौणखनिज अधिकारी दीपक चव्हाण (जळगाव). तहसीलदार कैलास चावडे (पाचोरा), मिलिंद कुमार वाघ (अमळनेर), नायब तहसिलदार निकेतन वाळे (मुक्ताईनगर), अंगद आसटकर (भुसावळ), लेखापाल विलास पाटील (जळगाव), मंडळ अधिकारी विठोबा पाटील (रावेर) उदय निबाळकर (एरंडोल), सचिन जगताप (रावेर), किशोर तायडे (मुक्ताईनगर),अव्वल कारकून देवेंद्र कोळी (एरंडोल), सारिका भालेराव (बोदवड), दिलीप राजपूत (भडगाव), मधुकर नंदनवार (एरंडोला पल्लवी खड़के, जयश्री पवार, अमोल  गणेश हटकर, जागृती पवार (जळगाव), महसूल सहाय्यक सोमनाथ वाघ (जामनेर), पंकज भागवत (भडगाव), तुषात अहिरे (चाळीसगाव), गणेश नाईक (पारोळा), पंकज शिंदे (धरणगाव), अमोल पाटील (भुसावळ), स्वप्निल येवले, विशाल बि-हाडे, राजश्री पाचपोळ (जळगाव), तलाठी सलमान तडवी (एरंडोल), भूषण बाविस्कर (पारोळा), पवन नवगाळे (भुसावळ), मृणाली सोनवणे (जळगाव), अजय पावरा (चोपडा), वाहनचालक कैलास माळी (पारोळा), शिपाई गोपीचंद महाजन (पाचोरा), संजय चरा, मदन काळे, सुशील पाटील (जळगाव), कोतवाल संजय अंबेकर (जामनेर), विनोद अटकाळे (रावेर), सोनूसिंग पाटील (यावल), शिवाजी उप्पर (चाळीसगाव).

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे