आपल खान्देशगुन्हेगारी

शेतीच्या वादातून भडगाव तालुक्यातील पळासखेड्यात गोळीबार; एक जखमी

भडगाव तालुक्यातील पळासखेडा येथे आज झालेल्या गोळीबारात एक जण जखमी झाल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत वृत्त असे की,भडगाव तालुक्यातील पळासखेडा येथे एकावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडल्याने परिसरात दहशतीचे वातावरण तयार झाले असून एक छोट्याशा गावात गोळीबार होत असल्याने व मागील आठवड्यात जळगाव जिल्ह्यात अश्या बऱ्याच घटना घडल्यामुळे जळगाव जिल्ह्यात बिहारी राज सुरु झाले की काय असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून विचारला जात असून या घटनेमुळे हा परिसर हादराला आहे.

प्राथमिक माहितीनुसार जमीनीच्या वादातून ही घटना घडली असून या गोळीबारात पळाखखेडा येथील शेतकरी अशोक शिवाजी पाटील हे जखमी झाले असल्याची प्रार्थमिक माहिती समोर येत आहे. आहे. या घटनेतील जखमी अशोक पाटील यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे समजते.

या घटनेतील जखमी अशोक पाटील यांनी दिलेल्या व जनतेतून मिळालेल्या माहिती नुसार समजलेली माहिती अशी की अशोक पाटील आणि पळासखेडा येथील विजय दोधा पाटील यांचा रस्त्यावरून जुना वाद आहे. याच विषयावरून आज सकाळी पावणेनऊ वाजेच्या सुमारास जखमी अशोक पाटील व विजय पाटील यांच्यात पुन्हा एकदा वाद झाला. यात विजय दोधा पाटील यांनी त्यांच्याकडील पिस्तुल काढून अशोक पाटील यांच्यावर चार फैरी झाडल्या. यातील एक गोळी अशोक पाटीला यांना लागली असून यात ते जखमी झाले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे