ब्रेकिंगमहाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आंदोलकांच्या प्रतिनिधींची बैठक

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आंदोलकांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. खासदार संभाजीराजे छत्रपती यांना सामंजस्याची भूमिका घेतल्याबद्धल मुख्यमंत्र्यांनी मनोमन धन्यवाद दिले. आंदोलन करू नका असे आवाहन करतानाच प्रलंबित प्रश्नांवर तातडीने मार्ग काढण्याचे निर्देश दिले.

  सरकार तुमचं ऐकतंय मग आंदोलने कशाला? त्यापेक्षा आपण आजच्यासारखं एकत्र बसून तोडगा काढू. सारथीच्या योजनांना कुठेही पैसा कमी पडू दिला जाणार नाही. समाजातील निवडक जणांची समिती नेमून त्यामाध्यमातून समाजाचे प्रमुख प्रश्न लगेच सोडविण्यासाठी समन्वयाने काम करू- मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे.

   सह्याद्री अतिथीगृह येथे सुमारे ३ तास चाललेल्या बैठकीत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मांडलेल्या मुद्द्यांवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी सरकार मराठा समाजाच्या पाठीशी असून आम्ही पूर्णपणे सकारात्मक आहोत असे सांगितले. बैठकीनंतर आंदोलक प्रतिनिधींनी देखील मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांच्या या भूमिकेचे स्वागत केले तसेच पुढे देखील प्रश्नांची सोडवणूक वेगाने होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण साहेब, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात साहेब, उपसमितीचे सदस्य गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील साहेब, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उद्योगमंत्री सुभाष देसाई साहेब, जलसंपदामंत्री जयंत पाटील साहेब, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार साहेब, राज्यमंत्री (गृह) सतेज पाटील साहेब, खासदार विनायकजी राऊत, आमदार वैभव नाईक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जऱ्हाड, बहुजन कल्याण विभागाचे प्रधान सचिव जे पी गुप्ता, उच्च व तंत्रशिक्षण सचिव ओ पी गुप्ता, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे, विधी व न्याय सचिव श्री देशमुख, महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी आदी यावेळी उपस्थित होते. तसेच मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे, विनोद पाटील, ऍड अभिजित पाटील यांच्या सह अनेक समन्वयक ही यावेळी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे