आपल खान्देशमहाराष्ट्र

कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर महिला रिक्षामध्ये क्वारंटाईन

औरंगाबाद – हलाखीची परिस्थिती असल्याने कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर महिलेला रिक्षामध्ये विलगीकरण करून उपचार घेण्याची वेळ आली आहे. औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील ही घटना आहे.

गंगापूरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये राहणाऱ्या एका महिलेने घशात खवखव व अंगदुखी असल्याने गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणी केली. त्यानंतर 15 मे रोजी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. पुढील उपचारासाठी डॉक्टरांनी त्यांना कोरोना सेंटरमध्ये विलगीकरण होण्यास सांगितले. मात्र, या महिलेने घरीच क्वारंटाईन होण्याचा पर्याय निवडला.

पण रोज मोलमजुरी करून पोट भरणारी ही महिला आपल्या कुटुंबासोबत छोट्याश्या झोपडीत राहते. त्यामुळे घरात लहान मुलगा असल्याने त्यांनाही आपल्यामुळे कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून या महिलेने भावाच्या रिक्षा टेम्पोमध्ये क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे