आपल खान्देश

बापुसाहेब हटकर यांनी कुंसुबा गावातील नवनिर्वाचीत पंच प्रमुख व समाज बांधवाचा केला सत्कार..

नार पार योजनामुळे खान्देश सुजलाम सुफालाम होणार – खान्देश भुषण बापुसाहेब हटकर.

दिलीप जय परदेशी

कुसुंबा (प्रतिनिधी) धनगर समाज नेते देविदास बापुसाहेब हटकर यांच्या हस्ते कुंसुबा गावातील नवनिर्वाचीत पंच प्रमुख व समाज बांधवाचे सत्कार करण्यात आले, माजी सरपंच ज्येष्ठ समाजसेवक श्री. गेंदा नागो परदेशी, श्री.महादु आबा, सर्वश्री पंचप्रमुख श्री. छबीलाल परदेशी, सचिव श्री.नारायण हरसिंग परदेशी, महिला पंच श्रीमती व उमधम महिला अध्यक्ष जिजाताई परदेशी, प्रसिद्ध कवी निंबाजी धनगर, मा.उपसरपंच उत्तम महादु, उत्तर महाराष्ट्र धनगर महासंघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर भाऊ परदेशी, उमधमचे कोषाध्यक्ष रमेश आबा परदेशी, धुळे जिल्हा युवा अध्यक्ष चेतन पाटील, धुळे तालुका अध्यक्ष मुकेश धनगर, नवीमुंबई धनगर समाज स.समिती जिल्हा अध्यक्ष व उमधमचे उपाध्यक्ष संदिपभाऊ पांढरे, श्री.सुनिल टेलर यांची इंदिरा नगर येथे सर्व जातीजमातीच्या वस्तीत अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबददल व तंगा मंगाना दंगा या नाटकातील कलाकर भटू चौधरी व कुंसुबाचे कुणाल शिंदे, गोटन धनगर यांचा ही सत्कार करण्यात आला.

यांच्या सह कुंसुबा गावाचे सुपुत्र कृष्णकांत राजेंन्द्र परदेशी याची मुंबई विध्यापीठात मागासवर्गीय कर्मचारी संघटनेत सचिव म्हणून निवड झाल्या बददल सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रम त्यानी समाज बांधवांना अनमोल मार्गदर्शन केले. लोंकाच्या आग्रहा खातर नारपार योजना बददल माहिती दिली खान्देशावर कसे अन्याय झाले, भाऊसाहेब हिरेना मुख्यमंत्री पद मिळू दिले नाही. म्हणून आज पर्यंत नारपार योजना झाली नाही, सुरगाना प्रातांत सह्याद्रीच्या कुशीत महाराष्ट्रात पडणारे पाणी सर्व गुजरातला पळवले जात आहे, म्हणून खान्देशचा विकास झाला नाही असे सांगितले व सर्वांना अहवान केले की १ मार्च भाऊसाहेब हिरेंचा वाढदिवस आहे या दिवशी प्रत्येक गावात जयंती साजरी करुन नारपार योजनेचे महत्त्व गावाला पटवुन दयावे असे अहवान केले. सदर कार्यक्रम उत्तर महाराष्ट्र धनगर महासंघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वरभाऊ परदेशी यांनी सुत्रसंचलन केले व सदर कार्यक्रम कमीवेळात यशस्वी केल्या बददल तरुणाचे आभार सामाजिक कार्यकर्ते डिंगबर परदेशी यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे