हसन मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळआ बाहेर काढणार – किरीट सोमय्या
“आमची मागणी आहे, की या घोटाळ्याचीही चौकशी व्हायला हवी. पुन्हा एकदा आपण भेटणार इथे किंवा कोल्हापूरला. हसन मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळा उघड करणार....
सातारा – भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना कराडमध्ये पोलिसांनी उतरवलं होतं. तिथेच आज सकाळी पत्रकार परिषद घेत त्यांनी ठाकरे सरकारवर कडाडून हल्ला चढवला. गडहिंग्लज कारखान्यातही 100 कोटींचा घोटाळा झाला आहे, असा आरोप करत हसन मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळआ बाहेर काढणार असल्याचं किरीट सोमय्या म्हणाले.सोमय्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. त्यासंबंधित पाहणीसाठी सोमय्या महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूरला निघाले होते. मात्र कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्यांना कायदा-सुव्यवस्थेचं कारण देत जिल्हाबंदी केली आहे. त्यानुसार पोलिसांनी सोमय्यांना पहाटे कराडमध्ये उतरवलं होत.
हे घोटाळे उघड करण्यास देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी…
हसन मुश्रीफ आणि कुटुंबीयांनी 127 कोटींचा घोटाळा केला, असा गंभीर आरोप किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषदेत केला. तसंच मला हे घोटाळे उघड करण्यास देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील सांगितलंय, असंही किरीट सोमय्या म्हणाले.“मी उदाहरण देतो. २०२० मध्ये कोणत्याही प्रकारे ट्रान्सपरंट बिडींग न होता, हा कारखाना ब्रिक्स इंडिया प्रा लि या कंपनीला दिला. या कंपनीला साखर कारखाना चालवायाचा अनुभव नाही. पण या कंपनीला का कारखाना दिला हे शरद पवारांना माहिती आहे. कारण मतीन हसीन मंगोली हे हसन मुश्रीफ यांचे जावई ते या ब्रिक इंडिया बेनामीचे मालक आहेत. या कंपनीत ७१८५ शेअर एस यू कॉर्पोरेषन प्रायव्हेट, ९९८ मतीन हसीनचे, तर ९९८ गुलाम हुसेनचे आहेत. म्हणजे परत सरसेनापती कारखान्यासारखे ९८ टक्के शेअर एस यू कार्पोरेशन या बेनामी कंपनीकडे. म्हणजे हसन मुश्रीफ यांनी २०१९-२० मध्ये ग्रामविकास मंत्री झाल्यानंतर जो भ्रष्ट मार्गाने पैसा कमावला, तो इथे पास केला आहे.”
किरीट सोमय्या पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
“आमची मागणी आहे, की या घोटाळ्याचीही चौकशी व्हायला हवी. पुन्हा एकदा आपण भेटणार इथे किंवा कोल्हापूरला. हसन मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळा उघड करणार”“मूळ विषय आहे की हसन मुश्रीफ साहेब 127 कोटी रुपये आपल्या कंपनीत मनी लाँडरिंगचे आले त्याचा हिशेब अजून का दिला नाही. शरद पवार साहेब ही तुमची व्यूवरचना आहे का.. मला चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय, बाकीचे विषय आम्ही बघतो, तुम्ही मुश्रीफांचे घोटाळे जनतेसमोर मांडा, अधिकाऱ्यांवरील गदांबाबत आम्ही बघतो.”“मी पुन्हा सांगतो, सरसेनापती घोरपडे कारखान्यात ९८ कोटी रुपये हे बोगस कंपन्याद्वारे भ्रष्टाचाराद्वारे आणले. मुश्रीफ परिवारातर्फे २ कोटी आहे, बाकी सगळा पैसा बोगस कंपन्याद्वारे आहे.”
ईडी आणि इन्कम टॅक्सकडे उद्या तक्रार करणार
“मुश्रीफांना आणखी एक प्रश्न विचारायचा आहे, आपला आणि अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना याचा संबंध काय? हसन मुश्रीफ यांचा दुसरा घोटाळा. मुश्रीफ परिवाराने अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्यात १०० कोटींचा घोटाळा केला. यामध्येही शेल कंपन्यांद्वारे पैसे उभारले. बोगस अकाऊंट उघडून कॅश टाकायचे आणि पैसे घ्यायचे, १०० कोटी रुपये घेतले.”
गडहिंगल्ज कारखान्यातील घोटाळ्याबाबत ईडी आणि इन्कम टॅक्सकडे उद्या तक्रार करणार, असंही सोमय्या यांनी सांगितलं.



