आपल खान्देश

जळगांव जिल्हापरिषदेचे जिल्ह्यातील दिव्यांगांकडे दुर्लक्ष

माहितीच्या अधिकारातून गंभीर बाब उघड: प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष योगेश पवार यांनी आणली समोर


झूम मराठी –  दिलीप परदेशी

अंमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील दिव्यांग ५% निधी खर्च करण्यात काही ग्रामपंचायती नि:समर्थी ठरल्याचा प्रकार प्रहार अपंग क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष योगेश पवार यांनी माहितीच्या अधिकारातून समोर आणल्याने ग्रामपंचायत,पंचायत समिती बरोबर जिल्हा परिषद देखील निसमर्थ ठरली आहे. सन २०१५ ते २०२१ पर्यंतच्या काळात दि.२५ जून २०१८ च्या शासन निर्णयाचे/नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करून दुर्लक्ष देखील केले जात आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दिव्यांगांवर कोविड-१९ मूळे उपासमारीची वेळ आली असल्याने शासनाचे कागदावर आदेश असूनही या आदेशांना केराची टोपली दाखवली जात आहे.

जळगांव जिल्हा परिषद यांच्या कडून उल्लंघन करणाऱ्या ग्रामपंचायतींवर कोणतीही कार्यवाही/कारवाई आज तागायत केली गेली नसल्याचा खुलासा माहितीच्या अधिकारातून समोर आला आहे. शासकीय विभागाकडून दिव्यांगांना सहानुभूती दाखवून जागतिक दिव्यांग दिवस साजरा करण्यात येतो दिव्यांगांना विविध योजनेची माहिती देण्यात येते परंतु हे शेवटी देखावा म्हणून केला जात आहे असे या खुलाश्या मधून लक्षात येते. जळगांव जिल्हापरिषदेचा भोंगळ कारभाराबाबत जिल्ह्यातील दिव्यांगांकडून नाराजगी व्यक्त केली जात असून या निषेधार्थ लवकरच प्रहार संघटनेकडून मोठे आंदोलन करणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. सदरील झालेल्या प्रकारचा अहवाल दिव्यांगांचे दैवत मा.ना.ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू राज्यमंत्री यांच्याकडे सोपविण्यात येणार असल्याचे योगेश पवार यांनी संगीगले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे