आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र
अस्मिता फाऊंडेशन अध्यक्षा ताईसो.अस्मिताताई पाटील यांच्याकडुन वेब मिडीया असोसिएशन पदाधिकारी पत्रकार बांधवाना मैत्री दिनाच्या शुभेच्छा दिल्या!
अस्मिता फाऊंडेशन अध्यक्षा ताईसो.अस्मिताताई पाटील यांच्याकडुन वेब मिडीया असोसिएशन पदाधिकारी व सदस्य पत्रकार बांधव यांना मैत्री दिनाच्या दिल्यात हार्दिक शुभेच्छा !

दोन दिवसांपुर्वी – अंगारकी चतुर्थी दिवशी अस्मिताताई यांच्या शुभहस्ते सर्व वेब मिडीया असोसिएशन चे सर्व पदाधिकारी व सदस्य यांचे झाले सत्कार समारंभ
आज मैत्री दिनाच्या निमित्ताने वडगाव टेक येथील आंब्याच्या बाग असलेल्या शेतात – सर्व पत्रकार बांधवांसोबत झाले चर्चा सत्र
पाचोरा प्रतिनिधी : वेब मिडीया असोसिएशन मुंबई’चे सर्व पदाधिकारी व सदस्य यांची निवड झाल्याबद्दल अस्मिता फाऊंडेशन चे अध्यक्षा ताईसो.अस्मिताताई पाटील यांनी अस्मिता फाऊंडेशन पाचोरा येथे सर्वांचे सत्कार करून सन्मानित करण्यात आले.
यावेळी सर्वांना अस्मिता फाऊंडेशन पाचोरा तर्फे यथोचित सन्मान वेब मिडीया असोसिएशन चे सर्व पत्रकार बांधव यांना देण्यात आला.
आज पुन्हा मैत्री दिनाच्या निमित्ताने वेब मिडीया असोसिएशन चे सर्व पत्रकार बांधवांना शुभेच्छा तर दिल्यात पण त्यांच्या वडगाव टेक येथील आंब्याची बाग असलेल्या शेतात सर्वांशी मनमोकळ्या गप्पा व चर्चा करण्यात आले. विविध विषयावर चर्चा करण्यात आली.
नेहमीच वेब मिडीया असोसिएशन च्या पत्रकारांसोबत अस्मिता फाऊंडेशन उभे असुन – आवश्यक ते सहकार्य करू असे आश्वासन दिले.एवढेच नव्हे तर अस्मिता फाऊंडेशन चे कार्यालय वेब मिडीया असोसिएशन च्या पत्रकारांच्या बैठकीसाठी जेव्हा आवश्यक असेल तेव्हा नक्कीच द्यावे अशी वेब मिडीया असोसिएशन ची मागणी केल्याने विनाविलंब ताईसो.अस्मिताताई पाटील यांनी मागणी मान्य केली.त्याबद्दल सर्वांनी त्यांचे आभार मानले.



