आपल खान्देशब्रेकिंग

धक्कादायक.. दोन चिमुकल्या भावंडांचा मृतदेह तरंगतांना आढळले विहरित!!

चुलत काकाला घेतले ताब्यात, चुलत काका हा मनोरूग्ण असल्याने त्यानेच दोघांना विहिरीत फेकल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

यावल (प्रतिनिधी) आई-वडिलांसोबत शेतात गेलेली दोन्ही मुले बेपत्ता झाल्याची घटना बुधवार दि.२७ रोजी चुंचाळे (ता.यावल) येथे घडली होती. दरम्यान, गुरुवार दि.२८ रोजी या दोन्ही भावंडांचा मृतदेह त्यांच्याच शेतातील विहरीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी यावल पोलिसात एकास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

यावल तालुक्यातील चुंचाळे येथील गायरान परिसरातील रहिवासी रवींद्र मधुकर सावळे (वय-३५) आणि उज्ज्वला सावळे हे दाम्पत्य बुधवार दि.२७ रोजी त्यांची दोन्ही मुले रितेश (वय-४) आणि हितेश (वय-३) यांना घेऊन त्यांच्या स्वत:च्या चुंचाळे शिवारातील गट नं. ३६५/१ मधील शेतात गेली होती. सावळे दाम्पत्य शेतात काम करत असतांना ही दोन्ही मुले खेळत असल्याने कुणी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. यादरम्यान दोन्ही मुले बेपत्ता झाले होते. या दोन्ही भावंडांचा चुंचाळे शिवारासह नायगाव, सौखेडासीमसह पंचक्रोशीत शोध घेण्यात आला. परंतू ते कुठेही आढळून न आल्याने याबाबत रात्री उशिरा यावल पोलीसात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, गुरूवारी २८ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्याच शेतातील विहिरीत या दोघं भावंडांचा मृतदेह तरंगतांना आढळून आल्याचे गावात एकच खळबळ उडाली आहे.


ताब्यात घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी विहिरीजवळ प्रचंड आक्रोश केला होता. यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार, सहाय्यक फौजदार विजय पाचपोळ आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. दरम्यान, मयत झालेल्या बालकांचा चुलत काका हा मनोरूग्ण असल्याने त्यानेच दोघांना विहिरीत फेकल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे यावल पोलीसांनी त्यांच्या चुलत काकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे