ब्रेकिंग

आडगांव ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी निवडणुकीच्या खर्चाचा हिशोब वेळेत सादर न केल्याने सदस्यत्व रद्द !


झूम मराठी | डिजिटल आवृत्ती 

एरंडोल (प्रतिनिधी) – तालूक्यातील आडगांवयेथील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी निवडणुकीच्या खर्चाचा हिशोब वेळेत आणि कायदेशीर रीतीने सादर केलेला नसल्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे अशी मागणी डॉ. प्रविण वाघ यांनी जिल्हाधिकारी यांचे कडे केली होती.

जिल्हाधिकारी डॉ अभिजित राउत यांनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून सर्व सदस्यांचे सदस्यत्व कायम ठेवण्याचा निर्णय दिनांक 16.2.2022. रोजी दिला होता. त्या निकाला विरुद्ध डॉ वाघ यांनी अप्पर आयुक्त नासिक यांचे कडे अपील दाखल केले असता अप्पर आयुक्त भानुदास पालवे यांनी सुनावणी घेऊन अपील फेटाळून सदस्यांचे सदस्यत्व कायम ठेवले आहे.

याबाबत माहिती अशी, की आडगाव येथील मागील वर्षी झालेली ग्रामपंचायत निवडणूक अत्यंत चुरशीची आणि अटीतटीची झाली होती. सरपंच सुनील दिलीप भिल, उपसरपंच दिलीप नथ्थू पवार, सदस्य प्रविण सुदाम पाटील, प्रल्हाद पोपट पाटील, शारदा पाटील, रवींद्र साबळे, संगीता महाजन, माया वनवे, कविता देवरे, आशा साबळे, सिमा महाजन, मुक्ताबाई राठोड, सखुबाई माळी यांनी निवडणूकीचा खर्च वेळेत आणि नियमाप्रमाणे सादर केला नाही म्हणून सर्वांचे सदस्यत्व रद्द करून अपात्र करण्यात यावे. असा अर्ज डॉ. प्रविण वाघ यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे महाराष्ट ग्राम पंचायत अधिनियम 1958 चे कलम १४/ ब अंतर्गत सादर केला होता. जिल्हाधिकारी यांनी कायदेशीर पणे सुनावणी घेऊन सदस्यानी मुदतित खर्च सादर केल्याचे सिद्ध झाल्या मुळे सदस्यांचे सदस्तव कायम ठेऊन अर्ज फेटाळल्या चा निकाल दिला होता. सदर निकाला विरुद्ध डॉ वाघ यांनी अप्पर आयुक्त नाशिक यांचे कोर्टात अपील दाखल केले असता त्यावर सुनावणी होऊन ग्रा. प. सदस्यांनी विहित मुदतित, विहित रीतीने, दैनंदिन खर्च आवश्यक बिलांसह सादर केलेला असून लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सदस्यांना तांत्रिक कारणाने अपात्र ठरविता येणार नाही. असा युक्तिवाद सरपंच, उपसरपंच व सदस्यांचे वकील अँड विश्वासराव भोसले यांनी मांडला. अँड. भोसले यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून सदस्यांचे सदस्यत्व ठेवण्याचा निर्णय अप्पर आयुक्त श्री पालवे यांनी नुकताच दिला आहे. सरपंच व सदस्यांचे वतीने अँड विश्वासराव भोसले यांनी काम पाहिले. या निर्णयाकडे तालुक्याचे लक्ष्य लागले होते.कायदेशीर निर्णय जाहीर झाल्यामुळे, उत्तम नाना पाटील, डॉ सुधाकर महाजन, छबू चौधरी, धनराज चव्हाण, जिभाऊ मोरे, कैलास तागड, अविनाश खैरनार यांचेसह ग्रामस्थांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला. आ. चिमणराव पाटील यांच्या सह पदाधिकाऱ्यांनी निकालावर समाधान व्यक्त करून व अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे