पाचोऱ्यातील राजकारणात, होळी आधीच धुळवळ!
पाचोरा लाईव्ह
दिलीप जय परदेशी
पाचोरा तालुक्यातील शिवसेना व भाजपच्या राजकारणात होळी आधीच धुळवळ झाल्याच्या चर्चेला उधान येत आहे. राज्यात आधीच शिवसेना व भाजपाचा कलगी तुरा सर्वश्रुत असताना, पाचोऱ्यात भाजपने मंगळवारी शेतकऱ्यांच्या वीजबिल प्रश्नावर राज्य सरकार विरोधात प्रचंड मोठी रॅली काढली होती रॅलीत स्थानिक आमदार किशोर आप्पा पाटील यांना भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी आमदाराना धारेवार धरून त्यांच्यावर शब्दिक मारा करून त्यांना कोंडीत पकडले, या मुळे पाचोरा तालुक्यातील राजकारण ढवळून काढले.

भाजपचा शिवसेने विरोधातील अर्थात आमदार किशोर आप्पा पाटील यांच्यावर शब्दिक मारा केल्याने, शिवसेनेच्या जिव्हारी लागला, आणि त्याच दिवशी मुंबईच्या अधिवेशनात शेतकऱ्यानां दिलासा मिळाला तीन महिने वीज तोडणी करणार नाही याची मोठी घोषणा ऊर्जामंत्री राऊत यांनी केली, मग काय शिवसेनेने दुसऱ्या दिवशी बुधवारी लगेच आपली मोर्चे बांधणी बांधत मुकुंद बिल्दीकर, पदमबापू, रावसाहेब पाटील सुमित पाटील आणि तालुक्यातील शिवसैनिकानी आपल्या पूर्ण ताकदीने भाजपला व तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांना टार्गेट करत भव्य गाढवाची रॅली काढून “आपुण भी कम नही ” असे भाजपला दाखून दिले.
यातच आज राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विकास पाटील यांनी शिवसैनिक आणि भाजपाच्या कार्यकर्त्यानां शांत राहण्याचा भावनिक संदेश दिला. जनतेचे प्रश्न, समस्या समजून त्या सोडवण्यासाठी राजकारण करावं, विधायक,विकासासाठी एकत्र बसावं,जनतेच्या प्रश्नांवर लढावं.
आपल्या समोर आपल्या तालुक्यासमोर जनतेसमोर अनेक प्रश्न असून आपण ते सोडवण्यासाठी प्राधान्य द्यावे, माझी या दोघा पक्षांना नेत्यांना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन आहे





