महाराष्ट्र

ओबीसी राजकीय आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत निवडणुका स्थगिती देण्यात यावी यासाठी नांदगाव तहसीलदारांना निवेदन



नांदगाव(प्रतिनिधी) मुक्ताराम बागुल- नांदगाव तालुक्यातील अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत जागा मी जिल्हा परिषद नगरपालिका तसेच स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येऊ नये यासाठी नांदगाव तहसील कार्यालयावर आंदोलन करण्यात आले यावेळी माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत 27 टक्के आरक्षण करण्याबाबत दिलेल्या निर्णयामुळे केवळ महाराष्ट्र राज्यातच नव्हे तर इतर देशातही ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षण धोक्यात आली आहे.
तसेच केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात ही पोरी कल डाटा देण्यास नकार दिला आहे यामुळे केंद्र सरकार ओबीसी समाजाचा हक्क डावलता आहे. यामुळे हे आंदोलन करण्यात आले होते.
कोण म्हणतं मिळणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही.
ओबीसी चा आरक्षणाचा हक्क मिळालाच पाहिजे, अखिल भारतीय समता परिषदेचे चा विजय असो, भारतीय महात्मा फुले परिषदेचा विजय असो, भुजबळ साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
केंद्र सरकारच्या भूमिकेचा ओबीसी समाजाच्या वतीने शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला जोपर्यंत ओबीसी समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत निवडणुका घेण्यात येऊ नये अशा प्रकारचे निवेदन तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थ कुमार मोरे यांच्या कडे नांदगाव वाशी यांच्या वतीने देण्यात आले.
यावेळी शिवा सोनवणे महिंद्र गायकवाड गौतम जगताप आयुब शेख जगताप सर राजेंद्र साठे बाळासाहेब देशमुख नारायण पवार सोपान पवार बाबा जेजुरकर सुगंधा खैरनार व इतर ओबीसी समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे