देश-विदेश

श्रीनगरमध्ये पोलीस बसवर दहशतवाद्यांचा हल्ला; दोन जवान शहीद

श्रीनगरमध्ये एका पोलीस बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची घटना काल रात्री घडली आहे. या घटनेत दोन जवान शहीद झाले असून, अन्य १२ जवान गंभीर जखमी झालेत. श्रीनगरमधील पंथा चौक परिसरात झेवानजवळ येथे काल(सोमवार) सायंकाळी हा हल्ला झाला.

सशस्त्र पोलीस बटालियनच्या बसवर हा दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी या बस वर मोठ्याप्रमाणात गोळीबार केला. या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले दुचाकीवरून आलेल्या दहशतवाद्यांनी बसवर बेछूट गोळीबार केला. जम्मू-काश्मीर पोलिसांची ही बस बुलेटप्रुफ नव्हती. त्यामुळे या हल्ल्यात पोलीस दलाचे मोठे नुकसान झाले. हल्ला झाल्यानंतर पोलीस दलाने या संपूर्ण परिसरास वेढा दिला असून, शोधमोहीम सुरू केली आहे. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची कडक तपासणी केली जात आहे. जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारा घटनेतील अनुच्छेद 370 रद्द केल्यानंतरचा हा पहिला मोठा दहशतवादी हल्ला आहे. जम्मू-काश्मीर पोलीस सशस्त्र दलाच्या पोलिसांना घेऊन जाणाऱ्या बसला दहशतवाद्यांनी श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर लक्ष्य केले. दहशतवाद्यांनी पोलिसांच्या बसवर अंधाधुंद गोळीबार केला.


 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे