आरोग्य व शिक्षण

उद्यापासून मुंबईत पहिले ते सातवीच्या शाळा सुरु होणार

उद्यापासून म्हणजेच १५ डिसेंबर, २०२१ पासून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या, इयत्ता पहिली ते सातवीच्या शाळा सुरू होत आहेत. यासाठी महानगर पालिकेने एक परिपत्रक काढून विद्यार्थी, पालक व शिक्षक यांनी कोविड विषयक सूचनांचे पालन करावे असे आवाहन केले आहे.

या परिपत्रकात असे नमूद करण्यात आले आहे कि, महाराष्ट्र शासन परिपत्रक दिनांक २४ सप्टेंबर २०२१ ला अनुसरून आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या मंजुरीने बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता आठवी ते बारावीच्या शाळा, परिपत्रक क्र. ईओजी/१७२७ दि. २९ सप्टेंबर २०२१ अन्वये ४ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू करण्यात आलेल्या आहेत.

यासोबतच महाराष्ट्र शासन परिपत्रक दि. २९ नोव्हेंबर २०२१ ला अनुसरून आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या मंजुरीने बृहन्मुंबई क्षेत्रातील इयत्ता पहिली ते सातवीच्या शाळा, परिपत्रक क्र ईओजी/२२३४ दि. ३० नोव्हेंबर २०२१ अन्वये दिनांक १५ डिसेंबर २०२१पासून कोविड विषयक सूचनांचे पालन करून सुरू करण्याच्या सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. तसेच परिपत्रक क्र.ईओजी/१२२ दि.०८ डिसेंबर २०२१ अन्वये अतिरिक्त सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार १५ डिसेंबर २०२१ पासून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या इयत्ता पहिली ते सातवीच्या शाळा सुरू होत आहेत , असे यामध्ये नमूद करण्यात आले 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे