कुसुंब्यात मैत्री बाकावरची माजी विद्यार्थी स्नेह सम्मेलन संपन्न!
माजी विद्यार्थ्यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा
मैत्री बाकावरची माजी विद्यार्थी स्नेह सम्मेलन १९८६ इयत्ता १० वी . ची बँच ऐ. मोतिराम कडू शिंदे विद्यालय कुसुंबा.
दिलीप जय परदेशी
कुसुंबा (प्रतिनिधी) कुसुंबा येथे काल सन १९८६ इयत्ता १० वी ची बँचचे मोतीराम कडू शिंदे विद्यालयातील विध्यार्थी यांचे कळंबेश्वर मंदिर या निसर्ग रम्य ठिकाणी मैत्री बाकावरची माजी विद्यार्थी स्नेह सम्मेलन संपन्न झाले.
शाळेतील मस्ती, एकत्रितपणे केलेला अभ्यास, शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील वचक, शाळेतील क्रीडा स्पर्धा, शिक्षकांनी दिलेली शिक्षा, स्नेहसंमेलन आणि त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाची धूम अशा विविध विषयांवर माजी विद्यार्थ्यांनी गप्पा करून जुन्या आठवणींना उजाळा दिला.

1986 मध्ये इयत्ता दहावीच्या शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळावा रविवारी कुसुम्बा येथील कळबेश्वर मंदिर च्या आवारात आयोजित करण्यात आला होता. कुसुम्बा येथील मोतीराम कडू शिंदे महाविद्यालयात शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज राजकारण, उद्योग, शिक्षण, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात काम करीत असून त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला आहे. शाळेतील माजी विद्यार्थी एकत्र आल्यावर सर्वांचे गुलाबाचे फूल देऊन स्वागत करण्यात आले. सर्व माजी विद्यार्थी एकत्र आल्यावर सर्वानी आपला परिचय दिल्यावर त्यावेळेच्या काही गमतीदार आणि काही चांगल्या आठवणींना उजाळा दिला. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत असताना जीवनात यश मिळवले असले तरी त्यामागे शाळेचे संस्कार आहेत, अशी भावना अनेक माजी विध्यार्थीनीं व्यक्त केली.




